पहिल्या दोन लढतींमध्ये एकतर्फी पराभव स्वीकारणारा भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या व अंतिम वन-डे आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात गोलंदाजी आक्रमणामध्ये बदल करणार असल्याचे जवळजवळ निश्चित आहे. भारतीय संघ सलग दुसऱ्या मालिकेत क्लीन स्विप टाळण्यासाठी प्रयत्नशील आहे. ऑस्ट्रेलिया ३-० ने विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर सलग दुसऱ्या मालिकेत भारताचा सफाया होईल. कारण यंदा वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडनेही भारताचा ३-० ने पराभव केला होता.
पहिल्या दोन सामन्यांत खोऱ्याने धावा फटकावल्या गेल्या. त्यात ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवताना विराट कोहलीच्या संघाविरुद्ध सहज विजय नोंदवले. भारतीय संघ मनुका ओव्हलमध्ये विजय मिळविण्यात यशस्वी ठरला तर टी-२० मालिकेपूर्वी आत्मविश्वास उंचावण्यास मदत होईल. टीम इंडियानं आजच्या सामन्यात टी नटराजनला ( T Natarajan) संधी दिली आहे. तामिळनाडूच्या या गोलंदाजानं Indian Premier League ( IPL 2020) च्या १३व्या पर्वात सर्वांना प्रभावित केले. तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियात चार बदल पाहायला मिळाले.
टी नटराजनचा प्रेरणादायी प्रवास
नटराजनची आई चिकन विकायची आणि वडील साडी तयार करण्याच्या कंपनीत कामाला होते. तीन बहिणी आणि तो असा हा परिवार. नटराजनचा प्रवास ऐकून अनेकांना प्रेरणा नक्की मिळाली असेल. 2017मध्ये किंग्ल इलेव्हन पंजाबनं त्याला ३ कोटींत आपल्या ताफ्यात घेतले. परंतु तीन वर्षांत त्याच्या वाट्याला सहाच सामने आले. २०१८मध्ये हैदराबादनं त्याला आपल्या संघात घेतले. आयपीएल २०२०मध्ये नटराजननं १६ सामन्यांत १६ विकेट्स घेतल्या. या लीगमध्ये त्यानं ६५ हून अधिक यॉर्कर फेकले.
पाहा नटराजनचा प्रवास...ऑस्ट्रेलिया XI: अॅरोन फिंच, मार्नस लाबुशेन, स्टीव्हन स्मिथ, मार्कस हेन्रीक्स, ग्लेन मॅक्सवेल, अॅलेक्स केरी, कॅमेरून ग्रीन ( पदार्पण), अॅश्टन अॅगर, सीन अॅबोट, अॅडम झम्पा, जोश हेझलवूड
IN - कॅमेरून ग्रीन, अॅश्टन अॅगर, सीन अॅबोट
OUT - डेव्हिड वॉर्नर, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स
भारत XI: शिखर धवन, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, शार्दूल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, टी नटराजन
IN - शुबमन गिल, शार्दूल ठाकूर, टी नटराजन, कुलदीप यादव
OUT - मयांक अग्रवाल, नवदीप सैनी, मोहम्मद शमी, युजवेंद्र चहल
Web Title: India vs Australia, 3rd ODI : T Natarajan is making his ODI debut for India, Cameron Green will make his debut
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.