मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात द्विदेशीय वन डे मालिका जिंकून इतिहास घडवण्याची संधी आहे. भारतीय संघाने सिडनीत विजय मिळवून तीन सामन्यांची मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. त्यामुळे मेलबर्नवर होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून ऐतिहासिक मालिका जिंकण्याचा भारताचा निर्धार आहे. या सामन्यात भारतीय संघात नवा भिडू पदार्पण करणार आहे. तामिळनाडूच्या विजय शंकरला तिसऱ्या आणि महत्त्वाच्या सामन्यात अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले आहे. भारतीय संघात वन डे पदार्पण करणारा तो 226 वा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू विजयचा प्रवास जाणून घेवूया...
- विजय शंकरचा जन्म 26 जानेवारी 1991 चा.
- विजय उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करतो.
- कारकिर्दीच्या सुरुवातीला विजय ऑफ स्पिनर होता, परंतु त्याने मध्यमगती गोलंदाज होण्याचे ठरवले आणि त्याला तामिळनाडू संघात स्थान पटकावले.
- प्रवासामुळे येणारा आळसपणा टाळण्यासाठी विजय घरच्या टेरेसवर क्रिकेटचा सराव करायचा. त्याने गच्चीचे नेट्समध्ये रुपांतर केले होते.
- वडील एच शंकर हेही त्यांच्या तरुणपणी क्रिकेट खेळायचे. मोठा भाऊ अजय हाही तामिळनाडूच्या विभागीय स्पर्धेत खेळतो
- स्थानिक स्पर्धांत त्याने जवळपास 50 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 41 सामन्यांत 2099 धावा त्याच्या नावावर आहेत.
- इंडियन प्रीमिअर लीगमध्ये तो सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळतो. 2014 मध्ये त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून एक सामना खेळला होता.
- राहुल द्रविड हा त्याचा आदर्श आहे. द्रविडची ॲडलेडवरील 233 आणि नाबाद 72 धावांची विजयी खेळीचा त्याच्यावर प्रचंड प्रभाव आहे. विजयला त्या खेळीतून आजही प्रेरणा मिळते.
- विजयच्या नेतृत्वाखाली तामिळनाडू संघाने विजय हजारे आणि देवधर ट्रॉफी जिंकली होती.
Web Title: India vs Australia 3rd ODI: Tamilnadu Vijay Shankar's debut for India ODI team
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.