मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला. चहलने सहा विकेट घेतल्या. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात प्रथमच द्विदेशीय वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. फलंदाजांची कसोटी पाहणाऱ्या खेळपट्टीवर धोनीने एका बाजूने संयमी खेळ करताना भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. ऑस्ट्रेलियाचे 231 धावांचे माफक लक्ष्य भारताने 7 विकेट राखून सहज पार केले. धोनीने नाबाद 87 धावा केल्या. कर्णधार विराट कोहली ( 46) आणि केदार जाधव ( नाबाद 61 ) यांनीही विजयात हातभार लावला. भारताने 49.2 षटकांत 3 बाद 234 धावा केल्या.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia 3rd ODI : 'विराट'सेना सुसाट... कसोटीपाठोपाठ वन डे मालिकेतही ऐतिहासिक विजय
India vs Australia 3rd ODI : 'विराट'सेना सुसाट... कसोटीपाठोपाठ वन डे मालिकेतही ऐतिहासिक विजय
India vs Australia 3rd ODI: महेंद्रसिंग धोनी पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. युजवेंद्र चहलने रचलेल्या मजबूत पायावर धोनीने विजयी कळस चढवला
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 4:14 PM