भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या वन डे सामन्यात यजमानांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. टीम इंडियानं सामन्यावर पकड घेतली असली तरी फलंदाजी करताना त्यांची डोकेदुखी वाढण्याचे संकेत मिळत आहेत. टीम इंडियाचा सलामीवीर शिखर धवनने दुखापतीमुळे मैदान सोडले आहे आणि त्याच्या खेळण्यावर संभ्रम निर्माण झाला आहे.
नुकताच दुखापतीतून सावरणाऱ्या धवननं श्रीलंकेविरुद्ध च्या ट्वेंटी-20 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन डे मालिकेत दमदार पुनरागमन केले. ऑसींविरुद्धच्या मालिकेत त्यानं दोन सामन्यांत अनुक्रमे 74 आणि 96 धावांची खेळी केली. पण, दुसऱ्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. त्याच्या खेळण्यावरही संभ्रम होता, परंतु तिसऱ्या सामन्यात त्याचा समावेश करण्यात आला. मात्र, क्षेत्ररक्षण करताना त्याचा उजवा खांदा दुखू लागला आणि त्याला मैदान सोडावं लागलं. त्याचा एक्स रे काढण्यात येणार असून त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल असे बीसीसीआयनं स्पष्ट केलं. दरम्यान, ऑसींनी 34 षटकांत 4 बाद 184 धावा केल्या आहेत.
पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज
India vs Australia, 3rd ODI: स्टीव्ह स्मिथनं कर्णधार फिंचला केलं बाद; पाहा नेमकं काय घडलं