भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या वन डे सामन्यात टीम इंडियानं बाजी मारली. शिखर धवनच्या अनुपस्थितीत सलामीला आलेल्या लोकेश राहुल आणि रोहित शर्मा यांनी दमदार सुरुवात करून दिली. रोहितनं खणखणीत शतक करताना टीम इंडियाच्या विजयाचा पाया रचला. त्याला विराट कोहलीनं सुरेख साथ दिली आणि टीम इंडियानं हा सामना जिंकून मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात 89 धावांची खेळी करून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीनं विराट पराक्रम केला. त्यामुळे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये महेंद्रसिंग धोनीचं नव्हे,तर विराटचं राज्य निर्माण झालं आहे.
स्टीव्ह स्मिथच्या शतकी खेळीनंतरही ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. जसप्रीत बुमराहचा टिच्चून मारा आणि मोहम्मद शमीनं दिलेली धक्के यामुळे टीम इंडियानं पाहुण्यांना 9 बाद 286 धावांवर समाधान मानण्यास भाग पाडले. स्मिथनं 132 चेंडूंत 14 चौकार आणि 1 षटकारासह 131 धावा केल्या. स्मिथला मार्नस लाबुशेनची चांगली साथ मिळाली. दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी 127 धावा जोडल्या. पण, त्यानंतर अॅलेक्स करी ( 35) वगळता स्मिथला हवी तशी साथ मिळाली नाही. स्मिथ व करी यांनी अर्धशतकी भागीदारी केली. टीम इंडियाकडून मोहम्मद शमीनं सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. रवींद्र जडेजानं दोन, तर नवदीप सैनी व कुलदीप यादव यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या
टीम इंडियाचा डबल धमाका, एकाच वेळी नमवलं दोन प्रतिस्पर्ध्यांना
India vs Australia, 3rd ODI: विराट कोहली जगात बेस्ट; महेंद्रसिंग धोनीचा लै भारी विक्रम मोडला
India vs Australia, 3rd ODI: स्टीव्ह स्मिथनं कर्णधार फिंचला केलं बाद; पाहा नेमकं काय घडलं
पृथ्वी शॉनं कुटल्या 150 धावा; टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज
Big Breaking : शिखर धवननं दुखापतीमुळे मैदान सोडलं, खेळण्यावर संभ्रम
India vs Australia, 3rd ODI: विराट कोहलीचा स्टनिंग कॅच, ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का Video
U19WC : टीम इंडियाची यंग ब्रिगेडही सुसाट... श्रीलंकेच्या गोलंदाजांची तुफान धुलाई
India vs Australia, 3rd ODI: रोहित शर्माचा विक्रम, हा पराक्रम करणारा जगातला तिसरा जलद फलंदाज
India vs Australia, 3rd ODI: हिटमॅन रोहित शर्माचे अर्धशतक, मोडला कोहलीचा विक्रम