India vs Australia, 3rd T20I : ऑस्ट्रेलियानं तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियाच्या बाजूनं झुकलेला सामना फिरवला. हार्दिक पांड्या व विराट कोहली यांना मोक्याच्या क्षणी माघारी पाठवून ऑस्ट्रेलियानं तिसरा सामना जिंकला. भारतानं ही मालिका २-१ अशा फरकानं जिंकली. या मालिकेतून ट्वेंटी-20 संघात पदार्पण करणाऱ्या टी नटराजननं ( T Natarajan) सर्वांना प्रभावित केलं. टीम इंडियाचे अन्य गोलंदाज सपाटून मार खात असताना टी नटराजननं आयपीएलमधील सातत्य कायम राखून ऑसी फलंदाजांना चाचपडण्यास भाग पाडले. त्यामुळेच मालिकेनंतर मिळालेली मॅन ऑफ दी सीरिज पुरस्काराची ट्रॉफी हार्दिक पांड्यानं ( Hardik Pandya) नटराजनच्या हाती सोपवून त्याच्यासोबत फोटोही काढला.
आजच्या सामन्यात अॅरोन फिंचचे पुनरागमन झाले, परंतु वॉशिंग्टन सुंदरनं त्याला भोपळाही फोडू दिला नाही. न देता दुसऱ्या षटकात माघारी जाण्यास भाग पाडले. मॅथ्यू वेड व स्टीव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करत ६५ धावांची भागीदारी केली. वेडनं ग्लेन मॅक्सवेलसह ऑस्ट्रेलियाला मोठी धावसंख्या उभारून दिली. या दोघांनी विकेटसाठी ९० धावांची भागीदारी केली. वेड ८० धावांवर माघारी परतला. मॅक्सवेलनं ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं २० षटकांत ५ बाद १८६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात अॅरोन फिंचनं पहिले षटक मॅक्सवेलला टाकायला दिले अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला ( ०) बाद केले. विराट कोहली-शिखर धवन या जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. ९व्या षटकात मिचेल स्वेप्सनच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा शिखरनं केलेला प्रयत्न फसला. डॅनीएल सॅम्सनं डिप मिडविकेटला अफलातून झेल टिपला. संजू सॅमसन ( १०) आणि श्रेयस अय्यर ( ०) झटपट माघारी परतले.
विराट आणि हार्दिक पांड्या यांनी टीम इंडियाचा विजय पक्का करतील असे वाटत होते, परंतु १८व्या षटकात अॅडम झम्पानं पांड्याला ( २०) माघारी पाठवले. त्याच षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वेडनं यष्टिंमागे विराटला जीवदान दिलं. पण, अँड्य्रू टायनं पुढील षटकात पहिल्या चेंडूवर विराटला बाद केले. विराट ६१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकार खेचून ८५ धावांवर माघारी परतला. भारताला ७ बाद १७४ धावांवर समाधान मानावे लागले. हार्दिक पांड्याला मॅन ऑफ दी सीरिज पुरस्कारानं गौरविण्यात आलं. पण, त्यानं ती ट्रॉफी टी नटराजनला दिली. या मालिकेत नटराजननं सर्वाधिक 6 विकेट्स घेतल्या.
Web Title: India vs Australia, 3rd T20I : Hardik Pandya hand over the man of the series award to T Natarajan
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.