Join us  

भारतीय गोलंदाजाने मालिका सुरू असताना मागितली सुट्टी; सूर्याकडून त्याला नव्या इनिंग्जसाठी शुभेच्छा 

IND vs AUS 3rd T20I Live : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांत सहज विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 6:50 PM

Open in App

IND vs AUS 3rd T20I Live : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने पहिल्या दोन ट्वेंटी-२० सामन्यांत सहज विजय मिळवला. आज ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा सामना जिंकून मालिका खिशात टाकण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे. तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू हेड याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. मुकेश कुमारच्या जागी आवेश खान याला आज संधी दिली गेली आहे. मुकेश कुमार लवकरच लग्न करणार असल्याने त्याने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली होती. बीसीसीआयने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी त्याची ही सुट्टी मंजूर केली आहे. रायपूर येथे होणाऱ्या चौथ्या सामन्यापूर्वी तो टीम इंडियात परतणार आहे. जलदगती गोलंदाज दीपक चहर याची भारतीय संघात निवड केली गेली आहे. टॉसनंतर सूर्यकुमार म्हणाला, आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. पहिल्या षटकापासून खेळपट्टीवर दव दिसतात. त्यामुळे मी खेळाडूंना आतापर्यंत जसं खेळत आलात तसंच खेळा, असे सांगितले आहे. आजच्या संघात मुकेशच्या जागी आवेश खानला संधी दिली गेली आहे. मुकेश आयुष्यातील सर्वात महत्त्वाची मॅच खेळायला गेला आहे. लग्नासाठी त्याला शुभेच्छा.  

भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद कृष्णा, आवेश खान.  

ऑस्ट्रेलियाचा संघ - आरोन हार्डी, ट्रॅव्हीस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, केन रिचर्डसन, नॅथ एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा 

 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय क्रिकेट संघसूर्यकुमार अशोक यादवबीसीसीआय