Join us  

१५ चेंडूंत २ धक्के! ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी पाहून सूर्यकुमार यादव आश्चर्यचकित झाला, Video 

India vs Australia 3rd T20I Live : पहिल्या दोन सामन्यांत सहज विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची सुरूवात आज काही खास झाली नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 7:42 PM

Open in App

India vs Australia 3rd T20I Live : पहिल्या दोन सामन्यांत सहज विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाची सुरूवात आज काही खास झाली नाही. जेसन बेहरेनडॉर्फ व झाय रिचर्डसन यांनी पहिल्या १५ चेंडूंत भारताच्या दोन फलंदाजांना माघारी पाठवले. डग आऊटमध्ये बसलेला कर्णधार सूर्यकुमार यादव ऑसी गोलंदाजांचा मारा पाहून आश्चर्यचकित झाला. पण, त्याने मैदानावर येऊन सलामीवीर ऋतुराज गायकवाडसह टीम इंडियाचा डाव सावरला. 

मुकेश कुमारची लग्नासाठी सुट्टी! कोण आहे दिव्या सिंग? जी होणार गोलंदाजाची पत्नी

तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मॅथ्यू हेड याने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघात एक बदल करण्यात आला आहे. मुकेश कुमारच्या जागी आवेश खान याला आज संधी दिली गेली आहे. मुकेश कुमार लवकरच लग्न करणार असल्याने त्याने बीसीसीआयकडे सुट्टी मागितली होती. बीसीसीआयने तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यापूर्वी त्याची ही सुट्टी मंजूर केली आहे. जलदगती गोलंदाज दीपक चहर याची भारतीय संघात निवड केली गेली आहे. पहिल्या दोन सामन्यांत आक्रमक सुरुवात करून देणारा यशस्वी जैस्वाल आज ६ धावांवर जेसन बेहरनडॉर्फच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. इशान किशनला ५ चेंडू खेळवून झाय रिचर्डसनने भोपळ्यावर माघारी पाठवले. भारताला २४ धावांवर २ धक्के बसले.   भारतीय संघ - यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद कृष्णा, आवेश खान.  

ऑस्ट्रेलियाचा संघ - आरोन हार्डी, ट्रॅव्हीस हेड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, केन रिचर्डसन, नॅथ एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियायशस्वी जैस्वालइशान किशनसूर्यकुमार अशोक यादव