India vs Australia, 3rd T20I : सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियात आता विराट कोहलीनं केला पराक्रम

पहिले षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकायला दिले अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला ( ०) बाद केले. विराट कोहलीला दोन जीवदान मिळाले

By स्वदेश घाणेकर | Published: December 8, 2020 04:32 PM2020-12-08T16:32:35+5:302020-12-08T16:33:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd T20I : Virat Kohli completed 3000 runs in Australia - second Indian in Sachin Tendulkar  | India vs Australia, 3rd T20I : सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियात आता विराट कोहलीनं केला पराक्रम

India vs Australia, 3rd T20I : सचिन तेंडुलकरनंतर ऑस्ट्रेलियात आता विराट कोहलीनं केला पराक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा दम दाखवला. मॅथ्यू वेड व ग्लेन मॅक्सवेल यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं मोठा पल्ला गाठला. प्रत्युत्तरात अॅरोन फिंचनं पहिले षटक ग्लेन मॅक्सवेलला टाकायला दिले अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला ( ०) बाद केले. विराट कोहलीला दोन जीवदान मिळाले आणि त्याचा फायदा उचलला. विराटनं दमदार खेळ करताना सचिन तेंडुलकरच्या ( Sachin Tendulkar) पंक्तित स्थान पटकावलं. 

आजच्या सामन्यात अॅरोन फिंचचे पुनरागमन झाले, परंतु वॉशिंग्टन सुंदरनं त्याला भोपळाही फोडू न देता दुसऱ्या षटकात माघारी जाण्यास भाग पाडले. मॅथ्यू वेड व स्टीव्हन स्मिथ यांनी संयमी खेळ करत पहिल्या पॉवर प्लेमध्ये संघाला १ बाद ५१ धावांपर्यंत मजल मारून दिली. या दोघांची ६५ धावांची भागीदारी सुंदरनं तोडली. १०व्या षटकात स्मिथ २४ धावांवर माघारी परतला. पहिल्या दहा षटकांत सुंदरनं ४ षटके फेकली आणि ३४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. वेड व ग्लेन मॅक्सवेलनं तुफान फटकेबाजी केली. मॅक्सवेलसोबत तिसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागीदारी करणारा वेड ८० धावांवर माघारी परतला. २०व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर टी नटराजननं मॅस्कवेलचा त्रिफळा उडवला. मॅक्सवेलनं ३६ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार खेचून ५४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियानं २० षटकांत ५ बाद  १८६ धावा केल्या. 

प्रत्युत्तरात अॅरोन फिंचनं पहिले षटक मॅक्सवेलला टाकायला दिले अन् त्यानं पहिल्याच चेंडूवर लोकेश राहुलला ( ०) बाद केले. तिसऱ्या षटकात मॅस्कवेलच्या गोलंदाजीवर विराट कोहलीही माघारी परतला असता, परंतु स्टिव्हन स्मिथनं त्याचा सोपा झेल सोडला. पाचव्या षटकात अँड्य्रू टायनं स्वतःच्याच गोलंदाजीवर विराटचा रिटर्न कॅच सोडला. त्यानंतर विराट व शिखर धवन या जोडीनं ऑसी गोलंदाजांची धुलाई केली. विराट फुल फॉर्मात दिसत होता. मिळालेल्या संधीचं सोनं करायचं एवढंच त्याच्या डोक्यात सुरू होते. 


विराट-शिखर जोडीनं दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावा जोडल्या. ९व्या षटकात मिचेल स्वेप्सनच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा शिखरनं केलेला प्रयत्न फसला. डॅनीएल सॅम्सनं डिप मिडविकेटला अफलातून झेल टिपला. ऑस्ट्रेलियात ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३००० धावा करणारा विराट दुसरा भारतीय ठरला. सचिन तेंडुलकरच्या नावावर ३३०० धावा आहेत. त्यानंतर आता विराटनं ३००० धावा केल्या. रोहित शर्मा १७८८, व्ही व्ही एस लक्ष्मण १७०३ आणि राहुल द्रविड १६८८ धावा केल्या आहेत.  

Web Title: India vs Australia, 3rd T20I : Virat Kohli completed 3000 runs in Australia - second Indian in Sachin Tendulkar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.