Join us  

India vs Australia, 3rd Test : अजिंक्य रहाणेनं टिपला 'Sharp' कॅच; ऑसी फलंदाज शतकाच्या उंबरठ्यावरून माघारी, Video

India vs Australia, 3rd Test : दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही पावसाचा खेळ झाला. त्यानंतर लाबुशेन व स्मिथ या जोडीनंही शतकी भागीदारी केली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 08, 2021 7:44 AM

Open in App
ठळक मुद्देपहिल्या सत्रात रवींद्र जडेजानं घेतल्या दोन विकेट्स, जसप्रीत बुमराहच्या नावे एकमार्नस लाबुशेन व स्टीव स्मिथ यांची शतकी भागीदारी जडेजानं तोडली

India vs Australia, 3rd Test, Day 2 : सिडनी कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र टीम इंडियाच्या नावावर राहिले. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आणि जसप्रीत बुमराह ( Jasprit Bumrah) यांनी ऑस्ट्रेलियाचा धक्के दिले. लंच ब्रेकपर्यंत निम्मा संघ माघारी पाठवला होता. पहिल्या दिवसाचे सत्कारमुर्ती विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. लाबुशेन शतकाच्या उंबरठ्यावर आला होता, परंतु अजिंक्य रहाणेनं ( Ajinkya Rahane) चपळाईनं कॅच घेताना त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. त्याच्या या कॅचचीच चर्चा आहे. ( Ajinkya Rahane's sharp catch )  

पहिल्या दिवशी पावसामुळे केवळ ५५ षटकांचा सामना झाला. पदार्पणवीर विल पुकोव्हस्की आणि मार्नस लाबुशेन यांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावून संघाला २ बाद १६६ करून दिल्या. पुकोव्हस्कीनं ११० चेंडूंत  ४ चौकारांच्या मदतीनं ६२ धावा केल्या. त्यानं लाबुशेनसह तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. लाबुशेन व स्टीव्ह स्मिथ ही जोडी चिकट निघाली. अश्विनच्या फिरकीचा चांगला अभ्यास करून ती मैदानावर उतरली होती. जडेजाचा कमीत कमी अभ्यास त्यांना करता यावा यासाठी अजिंक्यनं त्याला तीनच षटकं दिली.

दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रातही पावसाचा खेळ झाला. त्यानंतर लाबुशेन व स्मिथ या जोडीनंही शतकी भागीदारी केली. लाबुशेन शतकाच्या उंबरठ्यावर होता आणि अजिंक्यन जडेजाला पाचारण केलं. जडेजाच्या फिरकीवर लाबुशेन फसला आणि अजिंक्यनं स्लिपमध्ये शार्प कॅच टिपला. लाबुशेन १९६ चेंडूंत ११ चौकारांसह ९१ धावांवर माघारी परतला. ७१ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर जडेजाच्या फिरकीचा अंदाज घेण्यात लाबुशेन चुकला अन् चेंडू वेगानं स्लिपच्या दिशेनं गेला. अजिंक्यनं चपळाईनं तो चेंडू टिपला. अजिंक्य रहाणेची रणनिती यशस्वी ठरली, रवींद्र जडेजानं ऑसींना धक्के देत पहिले सत्र गाजवले

पाहा कॅच... स्मिथनं त्यानंतर अर्धशतक पूर्ण केले. पहिल्या दोन सामन्यांत सलामीला खेळणारा मॅथ्यू वेड पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जडेजानं त्यालाही जाळ्यात अडकवलं आणि जसप्रीत बुमराह करवी झेलबाद करून माघारी पाठवलं. त्यानंतर बुमराहनं कॅमेरून ग्रीनला भोपळ्यावर बाद केले. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं ५ बाद २४९ धावा केल्या आहेत.  

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाअजिंक्य रहाणे