India vs Australia, 3rd Test : रोहित शर्मामुळे 'या' काकांना कापावी लागली अर्धी मिशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

India vs Australia, 3rd Test, Day 3 : सिडनी कसोटीतून रोहित शर्माचे ( Rohit Sharma) टीम इंडियात पुनरागमन झाल्यानं त्याचे चाहतेच चांगलेच आनंदीत झाले.

By स्वदेश घाणेकर | Published: January 9, 2021 08:04 AM2021-01-09T08:04:30+5:302021-01-09T08:05:41+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test: because of Rohit Sharma uncle to cut half his mustache; Find out exactly what happened! | India vs Australia, 3rd Test : रोहित शर्मामुळे 'या' काकांना कापावी लागली अर्धी मिशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

India vs Australia, 3rd Test : रोहित शर्मामुळे 'या' काकांना कापावी लागली अर्धी मिशी; जाणून घ्या नेमकं काय घडलं!

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देआयपीएलमधील दुखापतीतून सावरत रोहित शर्माचे टीम इंडियात पुनरागमनरोहितनं केल्या ७७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून २६ धावा

India vs Australia, 3rd Test, Day 3 : सिडनी कसोटीतून रोहित शर्माचे ( Rohit Sharma) टीम इंडियात पुनरागमन झाल्यानं त्याचे चाहतेच चांगलेच आनंदीत झाले. रोहितला मोठी खेळी साकारता आली नाही, परंतु त्यानं शुबमन गिल ( Shubman Gill) सोबत टीम इंडियासाठी मजबूत पाया नक्की रचला. रोहितनं ७७ चेंडूंत ३ चौकार व १ षटकार खेचून २६ धावा केल्या. त्याच्या या एका षटकारानं विश्वविक्रमाची नोंद केली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये षटकारांचे शतक ठोकणारा तो जगातील पहिलाच फलंदाज ठरला. त्याच्या आसपासही कुणीच नाही. पण, रोहितमुळे एका काकांना चक्क त्यांची मिशी अर्धी कापावी लागली. जाणून घेऊया नेमकं काय झालं...

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोन्ही सलामीवीर गमावले. रोहित शर्मा २६, तर शुबमन गिल ५० धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार अजिंक्य व चेतेश्वर पुजारा यांनी दिवसअखेर भारताचा डाव सावरला आणि २ बाद ९६ धावांवर खेळ थांबला. रोहितच्या अंतिम ११मधील समावेशामुळे चाहते भलतेच खुश होते. पण, त्यात अजय नावाच्या या व्यक्तीनं, रोहित कसोटी क्रिकेटपटू असेल तर मी जगातला सर्वात हँडसम् पुरुष आहे ब्रॉड आणि अँडरसनचं एकेक षटक खेळून काढून दाखवू दे त्याला. ते जाऊ दे. स्टार्क, हेजलवुड आणि कमिन्स यांचे सगळे मिळून तीस चेंडू खेळून काढू दे, मी अर्धी मिशी काढून टाकतो. असे चॅलेंज दिले. 


रोहितनं ३० नव्हे तर ७७ चेंडू खेळून काढली आणि मग काय काकांनी त्यांचे वचन पुर्ण केलं.


दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या खात्यात २१ धावांची भर घालून अजिंक्य माघारी परतला. पॅट कमिन्सच्या उसळी घेतलेला चेंडू बॅटवर आदळून स्टम्प्सचा वेध घेऊन गेला. अजिंक्य २२ धावांवर बाद झाला. विहारीला संधीचं सोनं करण्याची संधी होती, परंतु नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेणं महागात पडले आणि जोश हेझलवूडनं अप्रतिम थ्रो करत त्याला ( ४) धावबाद केले. पुजारा आणि रिषभ पंत खेळपट्टीवर आहेत. लंच ब्रेकपर्यंत भारतानं ४ बाद १८० धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात भारतानं ८४ धावांवर दोन विकेट्स गमावल्या. 
 

Web Title: India vs Australia, 3rd Test: because of Rohit Sharma uncle to cut half his mustache; Find out exactly what happened!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.