India vs Australia, 3rd Test, Day 2 : रवींद्र जडेजाच्या ( Ravindra Jadeja) दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियानं तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३३८ धावांवर गुंडाळला. विल पुकोव्हस्की ( ६२), मार्नस लाबुशेन ( ९१) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर स्टीव्हन स्मिथनं ( १३१) शतकी खेळी केली. पण, जडेजानं ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारू दिला नाही. जडेजानं चार विकेट्स घेतल्या आणि शिवाय स्मिथला धावबाद करून माघारी जाण्यास भाग पाडले. त्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुबमन गिल ( Shubman Gill) या नव्या जोडीनं टीम इंडियाला सकारात्मक सुरुवात करून दिली. म्हणूनच त्यांचं लक्ष विचलित करण्यासाठी मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne ) सिली पॉईंटवर क्षेत्ररक्षण करताना प्रश्नांचा भडीमार करत आहे. त्याचा हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
जडेजानं दुसऱ्या दिवशी मॅथ्यू वेडला माघारी पाठवले आणि त्यानंतर जडेजा-अजिंक्य जोडीनं शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या लाबुशेनला ९१ धावांवर बाद केले. मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स व नॅथन लियॉन यांनाही जडेजानं माघारी पाठवून टीम इंडियाचं टेंशन हलकं केलं. स्मिथनं खिंड लढवली. त्यानं २७ वे कसोटी शतक पूर्ण केले. तळाच्या फलंदाजांना फार योगदान देता आले नाही. स्मिथला १३१ धावांवर बाद झाला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ३३८ धावांवर तंबूत परतला.
मयांक अग्रवालच्या जागी संघात पुनरागमन करणाऱ्या रोहितनं युवा फलंदाज शुबमनसह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. १५ षटकं टाकूनही विकेट हाती लागत नसल्यानं ऑसीचा क्षेत्ररक्षक लाबुशेन सिली पॉईंटवरून भारतीय फलंदाजांचं चित्त विचलीत करण्याचा प्रयत्न करत होता. त्याच्या एका प्रश्नवार शुबमननं सडेतोड उत्तर दिलेही.
पाहा व्हिडीओ...