Join us  

India vs Australia, 3rd Test : धावता येईना...! टीम इंडियाचा डाव गडगडला; चेतेश्वर पुजाराच्या अर्धशतकानंतरही राहिले पिछाडीवर

India vs Australia, 3rd Test Day 3 : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या विकेटनंतर टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीवरील पकड सैल झाली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 09, 2021 9:47 AM

Open in App
ठळक मुद्देभारताचे तीन फलंदाज धावबाद होऊन तंबूत परतले ऑस्ट्रेलियाच्या ३३८ धावांच्या उत्तरात टीम इंडियाचा डाव गडगडलाशुबमन गिल व चेतेश्वर पुजारा यांची अर्धशतकी खेळी

India vs Australia, 3rd Test Day 3 : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या विकेटनंतर टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीवरील पकड सैल झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक मारा करताना पुजारा-पंत या सेट जोडीला माघारी पाठवले. टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा योगदान न देताच माघारी जाणे योग्य समजले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या उत्तरात टीम इंडियाला पिछाडीवरच रहावे लागले. ही पिछाडी टीम इंडियाला दुसऱ्या डावात महागात पडणार आहे. भारताचे तीन फलंदाज धावबाद होऊन माघारी परतले. 

तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी माघारी परतल्यानंतर पुजारा आणि रिषभ यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ही जोडी तोडण्यासाठी नवा चेंडू हाती येताच ऑसी जलदगती गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा केला आणि त्यात रिषभ दुखापतग्रस्त झाला. वेदना होत असतानाही तो खेळपट्टीवर राहिला, परंतु त्याला फार काळ संघर्ष करता आला नाही. टीम इंडियाला सलग दोन धक्के देत ऑसींनी कमबॅक केले. सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या खात्यात २१ धावांची भर घालून अजिंक्य माघारी परतला. पॅट कमिन्सच्या उसळी घेतलेला चेंडू बॅटवर आदळून स्टम्प्सचा वेध घेऊन गेला. अजिंक्य २२ धावांवर बाद झाला.  नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेणं विहारीला महागात पडले आणि जोश हेझलवूडनं अप्रतिम थ्रो करत त्याला ( ४) धावबाद केले.  

उपहारानंतर रिषभ व पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पुजारानं १७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं. तत्पूर्वी पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रिषभच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. त्यासाठी त्याला मैदानावर उपचार घ्यावे लागले. काही षटकानंतर जोश हेझलवूडनं रिषभला बाद केले. रिषभ ६७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीनं ३६ धावांवर डेव्हिड वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यापाठोपाठ कमिन्सनं पुजारालाही माघारी पाठवले. रवींद्र जडेजाच्या तोडीस वेगाने पळणे आर अश्विनला काही जमले नाही आणि तो धावबाद झाला. टीम  इंडियाचा डाव २४४ धावांवर गडगडला आणि ते ९४ धावांनी पिछाडीवर आहेत. पॅट कमिन्सनं चार विकेट्स घेतल्या. जडेजा २८ धावांवर नाबाद राहिले. दुसऱ्या पर्वात भारतानं ६४ धावांत ६ विकेट गमावल्या, 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवींद्र जडेजाआर अश्विनचेतेश्वर पुजाराशुभमन गिलअजिंक्य रहाणेरिषभ पंत