India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला आधी दुखापतग्रस्त केलं अन् नंतर विकेट घेतली, टीम इंडियाचे ६ फलंदाज संघ तंबूत

India vs Australia, 3rd Test Day 3 : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत.

By स्वदेश घाणेकर | Published: January 9, 2021 08:50 AM2021-01-09T08:50:14+5:302021-01-09T08:51:34+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test Day 3 : Rishabh Pant received treatment after copping a blow to his elbow, Two wickets in quick succession for Australia | India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला आधी दुखापतग्रस्त केलं अन् नंतर विकेट घेतली, टीम इंडियाचे ६ फलंदाज संघ तंबूत

India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला आधी दुखापतग्रस्त केलं अन् नंतर विकेट घेतली, टीम इंडियाचे ६ फलंदाज संघ तंबूत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देतिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात टीम इंडियाला ८४ धावांत २ धक्के चेतेश्वर पुजारा-रिषभ पंत यांची अर्धशतकी भागीदारीपॅट कमिन्स व जोश हेझलवूड यांच्यामुळे ऑस्ट्रेलियाचं कमबॅक

India vs Australia, 3rd Test Day 3 : तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत. टीम इंडियाच्या फलंदाजांचे लक्ष विचलित करण्यासाठी स्लेजिंग करण्याचा प्रयत्न ऑसींकडून होताना दिसला, त्यात गोलंदाजांनी बाऊन्सरचा भडीमार करून फलंदाजांना दुखापतग्रस्त करण्याचाही खेळ केला. तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी माघारी परतल्यानंतर चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ही जोडी तोडण्यासाठी नवा चेंडू हाती येताच ऑसी जलदगती गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा केला आणि त्यात रिषभ दुखापतग्रस्त झाला. वेदना होत असतानाही तो खेळपट्टीवर राहिला, परंतु त्याला फार काळ संघर्ष करता आला नाही. टीम इंडियाला सलग दोन धक्के देत ऑसींनी कमबॅक केले.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांचा पाठलाग करताना टीम इंडियानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरच्या सत्रात दोन्ही सलामीवीर गमावले. रोहित शर्मा २६, तर शुबमन गिल ५० धावांवर माघारी परतला. तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या खात्यात २१ धावांची भर घालून अजिंक्य माघारी परतला. पॅट कमिन्सच्या उसळी घेतलेला चेंडू बॅटवर आदळून स्टम्प्सचा वेध घेऊन गेला. अजिंक्य २२ धावांवर बाद झाला. विहारीला संधीचं सोनं करण्याची संधी होती, परंतु नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेणं महागात पडले आणि जोश हेझलवूडनं अप्रतिम थ्रो करत त्याला ( ४) धावबाद केले. लंच ब्रेकपर्यंत भारतानं ४ बाद १८० धावा केल्या आहेत. पहिल्या सत्रात भारतानं ८४ धावांवर दोन विकेट्स गमावल्या होत्या.

उपहारानंतर रिषभ व पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पुजारानं १७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं. तत्पूर्वी पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रिषभच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. त्यासाठी त्याला मैदानावर उपचार घ्यावे लागले. काही षटकानंतर जोश हेझलवूडनं रिषभला बाद केले. रिषभ ६७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीनं ३६ धावांवर डेव्हिड वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यापाठोपाठ कमिन्सनं पुजारालाही माघारी पाठवले. १९५ धावांवर टीम इंडियाचे सहा फलंदाज माघारी परतले आहेत. भारत अजूनही १३६ धावांनी पिछाडीवर आहे.




Web Title: India vs Australia, 3rd Test Day 3 : Rishabh Pant received treatment after copping a blow to his elbow, Two wickets in quick succession for Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.