ठळक मुद्देमार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरून ग्रीन यांची अर्धशतकी खेळीऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित, भारतासमोर ४०७ धावांचे आव्हान
India vs Australia, 3rd Test Day 4 : भारतीय खेळाडूंची गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन पुन्हा एकदा घडवलं. वृद्धीमान सहाचा अफलातून झेल वगळता भारतीय क्षेत्ररक्षकांनी आज निराश केले. दिवसाच्या दुसऱ्या चेंडूपासून झेल सोडण्याचे सत्र सुरू झाले आणि जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर तीन सोपे झेल सोडले गेले. त्यात रोहित शर्मानेही सोपा झेल सोडण्यानं चाहते निराश झाले आहे. भारताच्या या चुकांचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी फायदा घेतला आणि टीम इंडियासमोर तगडं आव्हान उभं केलं.
मार्नस लाबुशेनचा ( Marnus Labuschagne ) तो झेल होता. नवदीप सैनीनं मात्र लाबुशेनला डोईजड होऊ दिले नाही. ७३ धावांवर त्याला वृद्धीमान सहाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सहानं अफलातून झेल घेतला. सैनीनं त्यानंतर मॅथ्यू वेडलाही ( ४) बाद करून ऑसींना दिवसातील दुसरा धक्का दिला.
लंच ब्रेकनंतर स्मिथनं धावांची गती वाढवली. पण, आर अश्विननं त्याला पुन्हा आपल्या फिरकीवर माघारी जाण्यास भाग पाडले. स्मिथ १६७ चेंडूंत ८ चौकार व १ षटकारासह ८१ धावांवर माघारी परतला. त्यानंतर कॅमेरून ग्रीन व टीम पेन यांना अनुक्रमे हनुमा विहारी व रोहित शर्मा यांनी जीवदान दिलं. हे दोन्ही झेल जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर सुटले. भारतीय क्षेत्ररक्षकांनी चार झेल सोडले. पेन व ग्रीन यांनी जीवदान मिळाल्यानंतर धावांची आघाडी वाढवली आणि झटपट शतकी भागीदारी केली. पेन व ग्रीन यांनी जोरदार फटकेबाजी केली. त्यामुळे अजिंक्यला क्षेत्ररक्षकांना सीमारेषेवर पाठवावे लागले.
त्यावेळी मोहम्मद सिराजवर पुन्हा एका चाहत्यानं वर्णद्वेषी टीका केली आणि सिराजनं त्वरित मैदानावरील अम्पायरकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेही भडकला आणि त्यानं त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. रहाणेच्या आक्रमकतेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि सिराजनं सांगितलेल्या स्टँडमधून प्रेक्षकांना बाहेर पाठवण्यात आले. टी टाईमपर्यंत ऑस्ट्रेलियानं ६ बाद ३१२ धावा करताना ४०६ धावांची आघाडी घेतली. ग्रीन ८४धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ६ बाद ३१२ धावांवर डाव घोषित करून भारतासमोर विजयासाठी ४०७ धावांचे आव्हान ठेवले.
Web Title: India vs Australia, 3rd Test Day 4 : Australia declare their 2nd innings at 312/6, India need 407 to win (Green 84, Smith 81, Labuschagne 73; Saini 2/54)
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.