India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड; विक्रमांची नोंद करून रोहित-शुबमन ही जोडी माघारी

India vs Australia, 3rd Test Day 4 :२ बाद १०३ वरून ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला. लाबुशेन चांगल्या फॉर्मात होता आणि दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याचा झेल सोडला. पण, नशीबानं तो महागात पडला नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: January 10, 2021 12:41 PM2021-01-10T12:41:57+5:302021-01-10T12:42:53+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test Day 4 : India need 309 runs & Australia need eight wickets in final Day, India go to stumps on day four at 98/2 | India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड; विक्रमांची नोंद करून रोहित-शुबमन ही जोडी माघारी

India vs Australia, 3rd Test : ऑस्ट्रेलियाची मजबूत पकड; विक्रमांची नोंद करून रोहित-शुबमन ही जोडी माघारी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देमार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, कॅमेरून ग्रीन यांची अर्धशतकी खेळीऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित, भारतासमोर ४०७ धावांचे आव्हानसलामीवीर म्हणून रोहित शर्माचे परदेशात पहिले अर्धशतक

India vs Australia, 3rd Test Day 4 : ऑस्ट्रेलियन फलंदाजांची फटकेबाजी, टीम इंडियाच्या खेळाडूंचे ढिसाळ क्षेत्ररक्षण ( Drop catch),  हुल्लडबाज प्रेक्षक ( Racism), अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) व मोहम्मद सिराजचा ( Mohammed Siraj) संताप अन् रोहित शर्माची अर्धशतकी खेळी... तिसऱ्या कसोटीचा चौथ्या दिवसाचा खेळ गाजला. भारतीय खेळाडूंनी दिलेल्या जीवदानाचा फायदा उचलताना ऑस्ट्रेलियानं धावांचा डोंगर उभा केला. ऑस्ट्रेलियानं दुसरा डाव ६ बाद ३१२ धावांवर घोषित केला. ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुबमन गिल ( Shubman Gill) यांनी सकारात्मक सुरुवात करून दिली, पण दिवसाचे पारडे ऑस्ट्रेलियाच्याच बाजूनं झुकलं. रोहित शर्मा-शुबमन गिल यांचा मोठा पराक्रम, १९६८ नंतर भारतीय सलामीवीरांचा ऑस्ट्रेलियात विक्रम!

२ बाद १०३ वरून ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला. लाबुशेन चांगल्या फॉर्मात होता आणि दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याचा झेल सोडला. ( रोहित तू पण!; जसप्रीत बुमराहचे दुर्दैव, भारतीय खेळाडूंनी सोडले चार सोपे झेल Video) पण, नशीबानं तो महागात पडला नाही. नवदीप सैनीनं पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के देत बॅकफुटवर पाठवले. दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंचे ढिसाळ क्षेत्ररक्षण कायम राहिले. स्मिथनं सेट झाल्यानंतर आक्रमक खेळ केला, परंतु शतकापासून तो वंचित राहिला. मार्नस लाबुशेन ( ७३), स्टीव्हन स्मिथ ( ८१) आणि कॅमेरून ग्रीन ( ८४) यांनी दमदार खेळ केला. टीम पेन व ग्रीन यांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. टी टाईमपूर्वी प्रेक्षकांच्या वर्णद्वेषी टीप्पणीचा मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा सामना करावा लागला. त्यामुळे काही काळ सामना थांबवण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं डाव घोषित केला. मोहम्मद सिराजवर पुन्हा वर्णद्वेषी टीका; अजिंक्य रहाणेचा आक्रमक पवित्रा, बोलवावे लागले पोलीस

४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानं सकारात्मक सुरुवात केली, परंतु त्यात सातत्य राखता आले नाही. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर ९८ धावांवर माघारी परतले होते. रोहितनं ५२, तर गिलनं ३१ धावा केल्या.  रोहित शर्मा ( Rohit Sharma) आणि शुबमन गिल ( Shubman Gill) यांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावा जोडल्या. गिल ३१ धावांवर माघारी परतला. १३ वर्षांत प्रथमच भारताच्या सलामीच्या जोडीला आशिया खंडाबाहेर कसोटीच्या चौथ्या डावात १५ हून अधिक षटक खेळण्यात यश आलं. २०१०नंतर एकाच कसोटीत दोन्ही डावात टीम इंडियाच्या सलामीवीरांना ५०+ भागीदारी करता आली. यापूर्वी २०१८मध्ये लोकेश राहुल व शिखर धवन यांनी ( ६० व ६०) ट्रेंट ब्रिज कसोटीत ही कामगिरी केली होती. 


Web Title: India vs Australia, 3rd Test Day 4 : India need 309 runs & Australia need eight wickets in final Day, India go to stumps on day four at 98/2

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.