ठळक मुद्देपाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला ३०९ धावा करायच्या आहेत यजमान ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्स घेण्याची गरज आहे. टीम इंडियानं चौथ्या दिवसअखेर २ बाद ९८ धावा केल्या
India vs Australia, 3rd Test Day 4 : ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानं चौथ्या दिवसअखेर २ बाद ९८ धावा केल्या आहेत. पाचव्या दिवशी सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला ३०९ धावा करायच्या आहेत, तर यजमान ऑस्ट्रेलियाला ८ विकेट्स घेण्याची गरज आहे. भारतीय संघानं यापूर्वीही असे अशक्यप्राय विजय मिळवले आहेत, परंतु यावेळी त्यांच्यासमोर दुखापतीचं सावट आहे. रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) आंगठ्याच्या दुखापतीमुळे २-३ आठवड्यांसाठी बाहेर गेला आहे आणि त्यात तो चौथ्या डावात खेळण्याची शक्यता .० टक्के आहे. रिषभ पंतही ( Rishabh Pant) दुखापतग्रस्त आहे आणि त्याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली आहे.
२ बाद १०३ वरून ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसाचा खेळ सुरू केला. लाबुशेन चांगल्या फॉर्मात होता आणि दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर त्याचा झेल सोडला. पण, नशीबानं तो महागात पडला नाही. नवदीप सैनीनं पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाला दोन धक्के देत बॅकफुटवर पाठवले. दुसऱ्या सत्रात भारतीय खेळाडूंचे ढिसाळ क्षेत्ररक्षण कायम राहिले. स्मिथनं सेट झाल्यानंतर आक्रमक खेळ केला, परंतु शतकापासून तो वंचित राहिला. मार्नस लाबुशेन ( ७३), स्टीव्हन स्मिथ ( ८१) आणि कॅमेरून ग्रीन ( ८४) यांनी दमदार खेळ केला. टीम पेन व ग्रीन यांनी सहाव्या विकेटसाठी शतकी भागीदारी केली. टी टाईमपूर्वी प्रेक्षकांच्या वर्णद्वेषी टीप्पणीचा मोहम्मद सिराजला पुन्हा एकदा सामना करावा लागला. त्यामुळे काही काळ सामना थांबवण्यात आला. त्यानंतर ऑस्ट्रेलियानं डाव घोषित केला.
४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियानं सकारात्मक सुरुवात केली, परंतु त्यात सातत्य राखता आले नाही. चौथ्या दिवसअखेर टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर ९८ धावांवर माघारी परतले होते. अजिंक्य रहाणे ( ४) आणि चेतेश्वर पुजारा ( ९) खेळत आहेत. या दोघांवरच अधिक भीस्त आहे, कारण हनुमा विहारी अजूनही फॉर्माशी झगडत आहे. रिषभ व रवींद्र दुखापतीमुळे मैदानाबाहेर आहेत. आर अश्विनची बॅट तळपली तर तळपली अन्यथा नाही. जसप्रीत बुमराह, नवदीप सैनी व मोहम्मद सिराज यांच्याकडून मोठी खेळीची अपेक्षा करणे चुकीचे आहे. पण, टीम इंडियासाठी एक सकारात्मक वृत्त समोर आले आहे. दुखापतीमुळे बाहेर बसलेला रिषभ पंत चौथ्या डावात फलंदाजी करेल, अशी माहिती आर अश्विननं दिली.
रिषभनं नेट्समध्ये सरावही केला. तो १०० टक्के तंदुरुस्त नाही, परंतु त्याला मैदानावर उतरावेच लागेल. भारतासाठी सध्याच्या अंतिम ११मध्ये चौथ्या डावात सर्वाधिक सरासरी ही रिषभची आहे. त्यानं ३ सामन्यांत ५४ च्या सरासरीनं १६२ धावा केल्या आहेत आणि त्यात इंग्लंडविरुद्धच्या शतकाचा समावेश आहे.
Web Title: India vs Australia, 3rd Test Day 4 : Ravi Ashwin (in Press) said "Rishabh Pant will bat in the 4th innings"
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.