India vs Australia, 3rd Test : असे सोपे झेल सोडल्यावर जिंकणार कसं?; दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर ऑसींना जीवदान

India vs Australia, 3rd Test Day 4 : यजमान ऑस्ट्रेलियानं चौथ्या कसोटीवरील पकड अजून मजबूत केली आहे. टीम इंडियासाठी हा दौरा काही चांगला राहिलेला नाही.

By स्वदेश घाणेकर | Published: January 10, 2021 07:28 AM2021-01-10T07:28:24+5:302021-01-10T07:29:09+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test Day 4 : Second ball of the day and Marnus Labuschagne gets a life, Hanuma Vihari has dropped a catch | India vs Australia, 3rd Test : असे सोपे झेल सोडल्यावर जिंकणार कसं?; दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर ऑसींना जीवदान

India vs Australia, 3rd Test : असे सोपे झेल सोडल्यावर जिंकणार कसं?; दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर ऑसींना जीवदान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देनवदीप सैनीनं पहिल्या सत्रात टीम इंडियाला मिळवून दिले दोन यशपहिल्या डावातील शतकवीर स्टीव्ह स्मिथचे अर्धशतक पूर्ण

India vs Australia, 3rd Test Day 4 : यजमान ऑस्ट्रेलियानं चौथ्या कसोटीवरील पकड अजून मजबूत केली आहे. टीम इंडियासाठी हा दौरा काही चांगला राहिलेला नाही. भुवनेश्वर कुमार आणि इशांत शर्मा यांनी आधीच दुखापतीमुळे दौऱ्यातून माघार घेतली. त्यात कसोटी मालिका सुरु असताना मोहम्मद शमी, उमेश यादव व लोकेश राहुल दुखापतीमुळे मायदेशात परतले. दुष्काळात तेरावा मास म्हणजे तिसऱ्या कसोटीत फॉर्मात असलेला रवींद्र जडेजाही २-३ आठवड्यांसाठी मैदानाबाहेर गेला. रिषभ पंतही दुखापतीशी झगडत आहे. एवढी सर्व संकट असताना भारतीय गोलंदाज सोपे झेल सोडून स्वतःसमोरील अडचणी आणखी वाढवताना दिसत आहेत. चौथ्या दिवसाच्या दुसऱ्याच चेंडूवर हनुमा विहारीनं ( Hanuma Vihari) सोपा सेल सोडला.

२ बाद १०३ धावांवरून चौथ्या दिवसाची सुरुवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला पहिल्या षटकाच्या दुसऱ्याच चेंडूवर झटका बसला असता. पण, स्क्वेअर लेगला उभ्या असलेल्या विहारीनं अगदी सोपा झेल टाकला. मार्नस लाबुशेनचा ( Marnus Labuschagne ) तो झेल होता. आधीच दुखापतीचं ग्रहण डोक्यावर असताना भारतीय खेळाडूंकडून अशा चूका झाल्यामुळे माजी खेळाडू सुनील गावस्करही भडकले. नवदीप सैनीनं मात्र लाबुशेनला डोईजड होऊ दिले नाही. ७३ धावांवर त्याला वृद्धीमान सहाकरवी झेलबाद करून माघारी पाठवले. सहानं अफलातून झेल घेतला. सैनीनं त्यानंतर मॅथ्यू वेडलाही ( ४) बाद करून ऑसींना दिवसातील दुसरा धक्का दिला.



ऑस्ट्रेलियानं पहिल्या सत्रात ३५ षटकांत ७९ धावा करताना २ विकेट गमावल्या. लंच ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियानं ४ बाद १८२ धावा करताना २७६ धावांची आघाडी घेतली आहे. पहिल्या डावातील शतकवीर स्टीव्ह स्मिथनं अर्धशतकी खेळी केली. सिडनी क्रिकेट मैदानावर सलग पाच अर्धशतक झळकावणारा तो पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठऱला.  यापूर्वी इंग्लंडच्या वॉली हॅमोंड यांनी ( १९२८-३६) सलग पाच ५०+ खेळी केल्या होत्या. भारताविरुद्ध दोन्ही डावांत ५०+ खेळी करण्याची स्मिथची ही तिसरी वेळ. त्यानं रिकी पाँटिंग आणि ख्रिस रॉजर्स यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. स्मिथनं यावेळी ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक कसोटी धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ९वे स्थान पटकावले. त्यानं डेव्हिड बून ( ७४२२ धावा) यांना मागे टाकले. 

 

Web Title: India vs Australia, 3rd Test Day 4 : Second ball of the day and Marnus Labuschagne gets a life, Hanuma Vihari has dropped a catch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.