India vs Australia, 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलियाच्या ४०७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडिया पाचव्या दिवशी शरणागती पत्करेल असा तर्क लावला गेला. ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंग यानं तर टीम इंडिया दुसऱ्या डावात दोनशे धावाही करणार नाही, असा दावा केला. पण, टीम इंडियानं संघर्ष करताना त्याचा दावा फोल ठरवत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. टीम इंडियानं १७ वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये ऐतिहासिक कामगिरी करण्याचाही पराक्रम आज केला.
पाचव्या दिवसाच्या सुरुवातीच्या षटकात कर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) बाद झाल्यानं टीम इंडियावरील संकट वाढलं.. आता काही खरं नाही, असं वाटत असताना रिषभ पंत ( Rishabh Pant) मैदानावर आला आणि तुफान फटकेबाजीला सुरुवात केली. त्याच्या फटकेबाजीमुळे पाँटिंगचा दावा फोल ठरला. दुसऱ्या बाजूनं चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) सपोर्टीव्ह नायकाची भूमिका पार पाडत होताच. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाच्या मानगुटीवर दुखापतीचं भूत बसलं आहे. दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी ते प्रत्यक्ष मालिकेला सुरुवात झाल्यानंतरही टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. ऑसी फॅन्सच्या वर्णद्वेषी शेरेबाजीचा Video Viral; त्यांची टीका ऐकून येईल प्रचंड राग
सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशी दुखापतग्रस्त रिषभ पंत ( Rishabh Pant ) याने मैदानावर उतरून जी फटकेबाजी केली, त्यानं सामन्याचं चित्रच पालटले. पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाला त्यानं विजयाचे किरण दाखवले. दुर्दैवानं ९७ धावांवर तो बाद झाला. हनुमा विहारीचा फॉर्म पाहता, आता टीम इंडियाचं काही खरं नाही, असंच वाटत होते. त्यामुळे फ्रॅक्चर अंगठा असूनही रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) गरज पडल्यास फलंदाजीला येण्यासाठी सज्ज होताच. सेट फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) ७७ धावांवर माघारी परतला. त्यात विहारीच्या मांडीचे स्नायू ताणले गेले आणि दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढली. पण, विहारी खेळपट्टीवर अडून बसला. ऑसी गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा करून आर अश्विनलाही दुखापतग्रस्त करण्याचा प्रयत्न केला. पण, अश्विन व विहारी यांचा संयमी खेळ सुरूच आहे. वेदना होत असतानाही रिषभ पंत ऑसींना भिडला, एकाही आशियाई यष्टिरक्षकाला न जमलेला पराक्रम केला!
भारतान १०१ षटकात ५ बाद २८८ धावा केल्या आहेत आणि त्यांना विजयासाठी ११९ धावांची गरज आहे. १७ वर्षांनंतर प्रथमच टीम इंडिया कसोटीच्या चौथ्या डावात १०० षटके खेळली. यापूर्वी २००२मध्ये भारतानं १०९.४ षटकं खेळली होती. त्या सामन्यात अजित आगरकर व आशिष नेहरा यांनी १०व्या विकेटसाठी ६३ धावांची भागीदारी केली होती.
भारताच्या लंचपर्यंत २०६ धावा; रिकी पाँटिंगचा दावा फोल, नेटिझन्सकडून होतोय ट्रोल!Web Title: India vs Australia, 3rd Test Day 5 : This is the first Time India batted 100+ overs in the 4th innings in last 17 years
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.