India vs Australia, 3rd Test Day 5 : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाच्या मानगुटीवर दुखापतीचं भूत बसलं आहे. दौऱ्याला सुरुवात होण्यापूर्वी ते प्रत्यक्ष मालिकेला सुरुवात झाल्यानंतरही टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. त्यामुळे कर्णधार अजिंक्य रहाणेवरील ( Ajinkya Rahane) दडपण वाढतच चालले आहे. पण, त्याला खेळाडूंची साथ मिळत आहे. सिडनी कसोटीच्या पाचव्या दिवशी दुखापतग्रस्त रिषभ पंत ( Rishabh Pant ) याने मैदानावर उतरून जी फटकेबाजी केली, त्यानं सामन्याचं चित्रच पालटले. पराभवाच्या छायेत असलेल्या टीम इंडियाला त्यानं विजयाचे किरण दाखवले. दुर्दैवानं ९७ धावांवर तो बाद झाला.
हनुमा विहारीचा फॉर्म पाहता, आता टीम इंडियाचं काही खरं नाही, असंच वाटतेय. पण, ड्रेसिंग रुममधून एक सकारात्मक चित्र पाहायला मिळालं. अंगठ्याला फ्रॅक्चर झाल्यानं दुसऱ्या डावात गोलंदाजी करू न शकलेला
रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) पॅड व ग्लोज घालून फलंदाजीला येण्यासाठी सज्ज झालेला पाहायला मिळाला.
सेट फलंदाज चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) ७७ धावांवर माघारी परतल्यानंतर जडेजा फलंदाजीला येण्यासाठी सज्ज झाला आहे.
गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन फलंदाजी करणार
सिडनी कसोटीत पहिल्या डावात फलंदाजी करत असताना मिचेल स्टार्कचा उसळता चेंडू जडेजाच्या डाव्या हाताच्या ग्लव्हजवर जोरात बसला होता. त्यामुळे जडेजाला दुखापत झाली होती. त्यानंतर करण्यात आलेल्या निदानामध्ये ही दुखापत गंभीर असल्याचे निष्पन्न झाले होते. या दुखापतीमुळे जडेजाला दुसऱ्या डावात गोलंदाजी करता आली नव्हती. आता त्याला या मालिकेतील शेवटचा सामना तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकावे लागणार आहे. मात्र असे असले तरी रवींद्र जडेजा सामन्याच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघाला गरज पडल्यास इंजेक्शन घेऊन फलंदाजी करणार आहे. भारतीय संघासाठी दिलासादायक बाब म्हणजे रिषभ पंतही दुसऱ्या डावात फलंदाजी करणार आहे.
Web Title: India vs Australia, 3rd Test Day 5 : Ravindra Jadeja has pads and gloves on, sitting in the dressing room to bat
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.