सिडनी: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील घटनेचा समांतर तपास करणार आहे. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल आयसीसीनं मागवला आहे.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia 3rd Test: भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी शेरेबाजीची ICCकडून दखल; अहवाल मागवला
India vs Australia 3rd Test: भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी शेरेबाजीची ICCकडून दखल; अहवाल मागवला
India vs Australia 3rd Test: आयसीसीनं क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे मागितला कारवाईचा अहवाल
By कुणाल गवाणकर | Published: January 10, 2021 5:53 PM