India vs Australia, 3rd Test : भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांनी शुक्रवारी मेलबर्न येथील हॉटेलमध्ये जेवण जेवलं. त्या वेळी एका चाहत्यानं टीम इंडियाच्या खेळाडूंचे बिल भरले आणि त्यानंतर खेळाडूंसोबत फोटोही काढले. भारतीय खेळाडूंनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याची चर्चा सुरू झाली आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया व BCCI यांनी या प्रकरणाती चौकशी करणार असल्याचाही दावा केला गेला. पण, आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. भारतीय खेळाडूंनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केले नसल्याचं स्पष्टीकरण BCCIकडून आलं आहे. त्यामुळे चिंता करण्याची गोष्ट नाही, असेही BCCIच्या अधिकाऱ्यानं ANIला सांगितले.
खेळाडूंनी सुरक्षिततेची सर्व नियम पाळली होती आणि त्यामुळे कोणत्याची तपासाची किंवा चौकशीची गरज नाही. त्या चाहत्यानंही यू टर्न मारला. सुरुवातिला रिषभ पंतनं मिठी मारल्याचं सांगितलं होतं. पण, अत्यानंदात तसं ट्विट केल्याचं फॅन्सने स्पष्टीकरण दिलं, असे ANI शी बोलताना सूत्रांनी सांगितले. ''जेवण करण्यासाठी खेळाडू रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्यांनी सर्व नियमांचं पालन केलं. त्यामुळे चिंतेचं कारण नाही. खेळाडू व फॅन्स यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन केलं होतं.''
भारतीय संघ सध्या मेलबर्न येथे सराव करत आहे. ७ जानेवारीपासून तिसरी कसोटी सिडनी येथे खेळवण्यात येणार आहे. तत्पूर्वी, या पाच खेळाडूंनी मेलबर्न येथील रेस्टॉरंटला शुक्रवारी भेट दिली व तिथे जेवण जेवले. तेव्हा त्याचवेळी त्यांच्या शेजारी बसलेल्या भारतीय चाहत्यानं त्यांचा व्हिडीओ टिपून सोशल मीडियावर पोस्ट केला. नवलदीप सिंग असे या चाहत्याचे नाव असून त्यानं ११८.६९ ऑस्ट्रेलियन डॉलर ( ६,६८३ रुपये) इतकं बिल भरल्याचा दावा केला आहे. त्यानं बिलाचा फोटोही सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. भारतीय खेळाडूंना जेव्हा हे समजलं, तेव्हा रोहितनं त्याला पैसे घेण्याची विनंती केली. असाही दावा नवलदीपनं केला. त्याचवेळी रिषभ पंतनं मिठी मारल्याचं ट्विटही नवलदीपनं केलं होतं, परंतु त्यानं आता यू टर्न मारला.
Web Title: India vs Australia, 3rd Test : Indian players followed protocols while visiting restaurant in Melbourne, BCCI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.