India vs Australia, 3rd Test : भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुबमन गिल आणि नवदीप सैनी यांनी शुक्रवारी मेलबर्न येथील हॉटेलमध्ये जेवण जेवलं. त्या वेळी एका चाहत्यानं टीम इंडियाच्या खेळाडूंचे बिल भरले आणि त्यानंतर खेळाडूंसोबत फोटोही काढले. भारतीय खेळाडूंनी कोरोना नियमांचं उल्लंघन केल्याची चर्चा सुरू झाली आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया व BCCI यांनी या प्रकरणाती चौकशी करणार असल्याचाही दावा केला गेला. पण, आता या प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे. भारतीय खेळाडूंनी कोणत्याही नियमांचं उल्लंघन केले नसल्याचं स्पष्टीकरण BCCIकडून आलं आहे. त्यामुळे चिंता करण्याची गोष्ट नाही, असेही BCCIच्या अधिकाऱ्यानं ANIला सांगितले.
खेळाडूंनी सुरक्षिततेची सर्व नियम पाळली होती आणि त्यामुळे कोणत्याची तपासाची किंवा चौकशीची गरज नाही. त्या चाहत्यानंही यू टर्न मारला. सुरुवातिला रिषभ पंतनं मिठी मारल्याचं सांगितलं होतं. पण, अत्यानंदात तसं ट्विट केल्याचं फॅन्सने स्पष्टीकरण दिलं, असे ANI शी बोलताना सूत्रांनी सांगितले. ''जेवण करण्यासाठी खेळाडू रेस्टॉरंटमध्ये गेली होती. त्यांनी सर्व नियमांचं पालन केलं. त्यामुळे चिंतेचं कारण नाही. खेळाडू व फॅन्स यांनी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचंही पालन केलं होतं.''