India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतची फटकेबाजी, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी व आर अश्विन यांची संयमी खेळी यामुळे सिडनी कसोटी सर्वांच्या चांगलीच लक्षात राहिल. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरी कसोटी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांच्या असभ्य वर्तणुकीनं गाजली. पण, टीम इंडियानं दुखापतग्रस्त खेळाडूंसह हा सामना अनिर्णीत राखला. विहारी-अश्विननं २५९ चेंडूंत ६२ धावांची नाबाद भागीदारी करून सामना अनिर्णीत राखला. विहारी १६१ चेंडूंत २३, तर अश्विन १२८ चेंडूंत ३९ धावांवर नाबाद राहिला. अश्विननं फक्त फलंदाजीतच नव्हे, तर शाब्दिक सडेतोड उत्तर देऊनही ऑस्ट्रेलियाची बोलती बंद केली.
रोहित शर्मानं ९८ चेंडूंत ५ चौकार व १ षटकारासह ५२ धावांची खेळी केली. शुबमन गिल ३१ धावांवर, तर अजिंक्य रहाणे ४ धावांवर बाद झाले. पुजारानं २०५ चेंडूंत १२ चौकारांसह ७७ धावा केल्या. रिषभ पंतनं ११८ चेंडूंत १२ चौकार व ३ षटकारांसह ९७ धावा चोपल्या. मालिका अजूनही १-१ अशी बरोबरीतच आहे आणि १५ जानेवारीपासून चौथा व अखेरचा कसोटी सामना ब्रिस्बेन येथे होणार आहे. अजिंक्यच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं आतापर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही.
अश्विन- विहारी जोडी बाद होत नाही, हे दिसताच ऑस्ट्रेलियानं स्लेजिंग सुरू केली. यष्टिंमागून ऑसी कर्णधार टीम पेन अश्विनचं लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करत होता. अश्विननंही त्याला तोडीसतोड उत्तर दिलं. त्यांचं संभाषण स्टम्प्स माईकमध्ये रेकॉर्ड झाले.
पाहा व्हिडीओ...