India vs Australia, 3rd Test : १००% तंदुरुस्त नसतानाही डेव्हिड वॉर्नरला खेळवलं, बघा मोहम्मद सिराजनं त्याचं काय केलं Video

India vs Australia, 3rd Test : ७ व्या षटकानंतर पावसाचा खेळ सुरू झाला आणि सामन्याचा बराच वेळ वाया गेला.

By स्वदेश घाणेकर | Published: January 7, 2021 07:33 AM2021-01-07T07:33:19+5:302021-01-07T07:36:47+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test : Mohammed Siraj dismisses David Warner, he falls inside 10 runs for 1st time since Nov 2016 in home Test, Video | India vs Australia, 3rd Test : १००% तंदुरुस्त नसतानाही डेव्हिड वॉर्नरला खेळवलं, बघा मोहम्मद सिराजनं त्याचं काय केलं Video

India vs Australia, 3rd Test : १००% तंदुरुस्त नसतानाही डेव्हिड वॉर्नरला खेळवलं, बघा मोहम्मद सिराजनं त्याचं काय केलं Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 3rd Test : भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र पावसामुळे बाधित झाले. सिडनी ( Sydney Test) कसोटीत ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मेलबर्न कसोटीत ( Boxing Day Test) बसलेल्या पराभवाच्या धक्क्यानंतर ऑस्ट्रेलियानं तगडा संघ मैदानावर उतरवला. प्रमुख फलंदाज डेव्हिड वॉर्नर ( David Warner) पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याला मैदानावर उतरवण्याचा डाव ऑसींनी खेळला, परंतु भारताकडून दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) त्याला इंगा दाखवला. सिराजनं त्याला चौथ्या षटकात माघारी जाण्यास भाग पाडले. 

वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी कमाल करेल, अशीच सर्वांना अपेक्षा होती. पण, सिराजनं त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. वॉर्नरला बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्यास सिराजनं भाग पाडले आणि चेतेश्वर पुजारानं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. वॉर्नर ५ धावांवर तंबूत परतला. मागील चार वर्षांत घरच्या मैदानावर खेळलेल्या २५ कसोटींत प्रथमच वॉर्नर दुहेरी आकडा पार करण्यात अपयशी ठरला. नोव्हेंबर २०१६मध्ये होबार्ट कसोटीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तो एका धावेवर माघारी परतला होता. जानेवारी २०२०मध्ये न्यूझीलंडविरुद्ध सिडनीत त्यानं दुसऱ्या डावात नाबाद १११ धावा केल्या होत्या. तत्पूर्वी त्यानं ४५, ३८, ४१, १९, ४३, ३३५* आणि १५४ अशा खेळी केल्या होत्या.  

पाहा व्हिडीओ...



दोन्ही संघ ( Playing XI) 
 

ऑस्ट्रेलिया ( Australia XI) : डेव्हिड वॉर्नर, विल पुकोव्हस्की, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, कॅमेरून ग्रीन, टीम पेन, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, नॅथन लियॉन, जोश हेझलवूड 

भारत ( India XI) : रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज  

Web Title: India vs Australia, 3rd Test : Mohammed Siraj dismisses David Warner, he falls inside 10 runs for 1st time since Nov 2016 in home Test, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.