India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये; वृद्धीमान सहा यष्टिरक्षणासाठी मैदानावर

India vs Australia, 3rd Test : पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रिषभच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. त्यासाठी त्याला मैदानावर उपचार घ्यावे लागले.

By स्वदेश घाणेकर | Published: January 9, 2021 10:03 AM2021-01-09T10:03:18+5:302021-01-09T10:07:44+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test : Rishab Pant is being taken to hospital for scans on his elbow, Wriddhiman Saha will keep wickets in the second innings | India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये; वृद्धीमान सहा यष्टिरक्षणासाठी मैदानावर

India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतला नेण्यात आलं हॉस्पिटलमध्ये; वृद्धीमान सहा यष्टिरक्षणासाठी मैदानावर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 3rd Test Day 3 : चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि रिषभ पंत ( Rishabh Pant) यांच्या विकेटनंतर टीम इंडियाची तिसऱ्या कसोटीवरील पकड सैल झाली. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भेदक मारा करताना पुजारा-पंत या सेट जोडीला माघारी पाठवले. टीम इंडियाच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा योगदान न देताच माघारी जाणे योग्य समजले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या उत्तरात टीम इंडियाला २४४ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात ९४ धावांची आघाडी घेतली. या धक्क्याबरोबर टीम इंडियाच्या चिंतेत रिषभ पंतच्या दुखापतीनं वाढ केली आहे. रिषभला दुखापतीच्या स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले आहे आणि दुसऱ्या डावात वृद्धीमान सहा ( Wriddhiman Saha ) यष्टिंमागे उभा राहणार आहे.


तिसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे व हनुमा विहारी माघारी परतल्यानंतर पुजारा आणि रिषभ यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. ही जोडी तोडण्यासाठी नवा चेंडू हाती येताच ऑसी जलदगती गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा केला आणि त्यात रिषभ दुखापतग्रस्त झाला. वेदना होत असतानाही तो खेळपट्टीवर राहिला, परंतु त्याला फार काळ संघर्ष करता आला नाही. टीम इंडियाला सलग दोन धक्के देत ऑसींनी कमबॅक केले. सकाळच्या सत्रात टीम इंडियाच्या खात्यात २१ धावांची भर घालून अजिंक्य माघारी परतला. पॅट कमिन्सच्या उसळी घेतलेला चेंडू बॅटवर आदळून स्टम्प्सचा वेध घेऊन गेला. अजिंक्य २२ धावांवर बाद झाला.  नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर चोरटी धाव घेणं विहारीला महागात पडले आणि जोश हेझलवूडनं अप्रतिम थ्रो करत त्याला ( ४) धावबाद केले.  

उपहारानंतर रिषभ व पुजारा यांनी अर्धशतकी भागीदारी केली. पुजारानं १७६ चेंडूंत ५ चौकारांच्या मदतीनं अर्धशतक पूर्ण केलं. तत्पूर्वी पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रिषभच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला दुखापत झाली. त्यासाठी त्याला मैदानावर उपचार घ्यावे लागले. काही षटकानंतर जोश हेझलवूडनं रिषभला बाद केले. रिषभ ६७ चेंडूंत ४ चौकारांच्या मदतीनं ३६ धावांवर डेव्हिड वॉर्नरच्या हाती झेल देऊन माघारी परतला. त्यापाठोपाठ कमिन्सनं पुजारालाही माघारी पाठवले. रवींद्र जडेजाच्या तोडीस वेगाने पळणे आर अश्विनला काही जमले नाही आणि तो धावबाद झाला. टीम  इंडियाचा डाव २४४ धावांवर गडगडला आणि ते ९४ धावांनी पिछाडीवर आहेत. पॅट कमिन्सनं चार विकेट्स घेतल्या. जडेजा २८ धावांवर नाबाद राहिले. दुसऱ्या पर्वात भारतानं ६४ धावांत ६ विकेट गमावल्या. 

Web Title: India vs Australia, 3rd Test : Rishab Pant is being taken to hospital for scans on his elbow, Wriddhiman Saha will keep wickets in the second innings

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.