ठळक मुद्देडेव्हिड वॉर्नर ५ धावांवर बाद, मोहम्मद सिराजनं घेतली विकेटपहिल्या दिवसाचे पहिले सत्र पावसामुळे वायाविल पुकोव्हस्की व मार्नस लाबुशेन यांची अर्धशतकी भागीदारी
India vs Australia, 3rd Test : भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिसऱ्या कसोटीचे पहिले सत्र पावसामुळे बाधित झाल्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणारा विल पुकोव्हस्की ( Will Pucovski) आणि मार्नस लाबुशेन यांनी यजमानांचा डाव सावरला. सिडनी ( Sydney Test) कसोटीत ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रमुख फलंदाज डेव्हिड वॉर्नर ( David Warner) पूर्णपणे तंदुरुस्त नसतानाही त्याला मैदानावर उतरवण्याचा डाव ऑसींनी खेळला, परंतु भारताकडून दुसराच कसोटी सामना खेळणाऱ्या मोहम्मद सिराजनं ( Mohammed Siraj) त्याला इंगा दाखवला. पण, त्यानंतर रिषभ पंतनं ( Rishabh Pant) दोन चुका करताना टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली.
वॉर्नर आणि विल पुकोव्हस्की ही जोडी ऑस्ट्रेलियासाठी कमाल करेल, अशीच सर्वांना अपेक्षा होती. पण, सिराजनं त्यांचे स्वप्न धुळीस मिळवले. वॉर्नरला बाहेर जाणाऱ्या चेंडूवर फटका मारण्यास सिराजनं भाग पाडले आणि चेतेश्वर पुजारानं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. वॉर्नर ५ धावांवर तंबूत परतला. मागील चार वर्षांत घरच्या मैदानावर खेळलेल्या २५ कसोटींत प्रथमच वॉर्नर दुहेरी आकडा पार करण्यात अपयशी ठरला. त्यानंतर पावसामुळे पहिले सत्र वाया गेले. पावसाच्या विश्रांतीनंतर पुकोव्हस्की व लाबुशेन यांनी ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला.
पदार्पणाचा सामना खेळणारा पुकोव्हस्की आत्मविश्वासानं भारतीय गोलंदाजांचा सामना करत होता. भारतीय गोलंदाजांना तो जुमानत नसल्याचे दिसताच कर्णधार अजिंक्य रहाणेनं हुकमी एक्का आर अश्विनला ( R Ashwin) पाचारण केलं. पण, लाबुशेननं अश्विनचा अभ्यास केला होता आणि त्यानंही त्याला अपयशी केलं. पुकोव्हस्कीला चकवण्यात अश्विन यशस्वी ठरला, परंतु रिषभनं यष्टींमागे सोपा झेल टाकला. त्यावेळी पुकोव्हस्की २६ धावांवर खेळत होता. पुकोव्हस्कीनं जीवदानानंतर खणखणीत चौकार मारून लाबुशेनसोबत ५० धावांची भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात सिराजच्या गोलंदाजीवर रिषभनं आणखी एक झेल सोडला. याहीवेळेस त्यानं पुकोव्हस्कीला जीवदान दिले.
Web Title: India vs Australia, 3rd Test : Rishabh Pant drops Will Pucovski two catches,Will that prove costly to Team India?
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.