India vs Australia, 3rd Test : क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही; वर्णद्वेषी टीका प्रकरणावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

India vs Australia, 3rd Test : क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली.

By स्वदेश घाणेकर | Published: January 11, 2021 09:01 AM2021-01-11T09:01:52+5:302021-01-11T09:02:03+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test : Sachin Tendulkar Reacts After Indian Players Allege Racial Abuse From SCG Crowd | India vs Australia, 3rd Test : क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही; वर्णद्वेषी टीका प्रकरणावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

India vs Australia, 3rd Test : क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही; वर्णद्वेषी टीका प्रकरणावर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 3rd Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला ( Mohammed Siraj) वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही ( Ajinkya Rahane) आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. या प्रकरणावर महान फलंदाज सचिन तेंडुलकर ( Sachin Tendulkar) प्रतिक्रिया दिली आहे. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही, असे मत त्यानं व्यक्त केलं. 

सचिन तेंडुलकरनं ट्विट केलं की,''खेळ म्हणजे सर्वांना एकत्र आणणे, लोकांमध्ये फूट पाडणे नाही. क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही. बॅट आणि बॉल यांना केवळ खेळाडूमधलं टॅलेंट समजतं.. त्याच्या धर्म, रंग, जात आणि राष्ट्रीयत्वाशी काहीच संबंध नसतो. ज्यांना हे समजत नाही, त्यांच्यासाठी स्टेडियममध्ये जागा नाही.'' 

भारतीय खेळाडूंवरील वर्णद्वेषी शेरेबाजाची ICCकडून दखल; अहवाल मागवला

ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनीत सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय खेळाडूंना वर्णद्वेषी शेरेबाजीचा सामना करावा लागला. या घटनेच्या चौकशीचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. याशिवाय क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील घटनेचा समांतर तपास करणार आहे. भारतीय खेळाडूंना प्रेक्षकांनी दिलेल्या वागणुकीबद्दल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या कारवाईचा अहवाल आयसीसीनं मागवला आहे.

 

या घटनेबद्दल ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डानं माफी मागितली. त्यानंतर आता आयसीसीनं घडलेल्या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. 'आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद सिडनीमधील क्रिकेट मैदानात झालेल्या वर्णद्वेषी शेरेबाजाची निंदा करते. क्रिकेट ऑस्ट्रेलियानं या प्रकरणाच्या तपासासाठी योग्य सहकार्य करावं,' अशा सूचना आयसीसीकडून देण्यात आल्या आहेत.

सर्वांना समान वागणूक द्या, कोणासोबतही भेदभाव करू नका, हे आमचं धोरण असल्याचं आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनू साहनी यांनी सांगितलं. आयसीसी कोणत्याही प्रकारचा भेदभाव सहन करणार नाही. खेळात भेदभावाला कोणतंही स्थान नाही. ऑस्ट्रेलियात घडलेल्या घटनेमुळे आम्ही निराश झालो आहोत, असं साहनी म्हणाले.

 

 

Web Title: India vs Australia, 3rd Test : Sachin Tendulkar Reacts After Indian Players Allege Racial Abuse From SCG Crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.