Join us  

India vs Australia, 3rd Test : रिषभ पंतच्या चुकीचा फटका; पहिल्या दिवसावर ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व

India vs Australia, 3rd Test : डेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी परतूनही ऑस्ट्रेलियाचे दमदार कमबॅक, नवदीप सैनी व मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेट

By स्वदेश घाणेकर | Published: January 07, 2021 1:19 PM

Open in App
ठळक मुद्देडेव्हिड वॉर्नर स्वस्तात माघारी परतूनही ऑस्ट्रेलियाचे दमदार कमबॅकनवदीप सैनी व मोहम्मद सिराज यांना प्रत्येकी एक विकेटविल पुकोव्हस्की, मार्नस लाबुशेन यांची अर्धशतकी खेळी

India vs Australia, 3rd Test : पदार्पणवीर विल पुकोव्हस्की ( Will Pucovski) आणि मार्नस लाबुशेन ( Marnus Labuschagne) यांनी सिडनी कसोटीचा पहिला दिवस गाजवला. १०० टक्के तंदुरुस्त नसूनही डेव्हिड वॉर्नरला ( David Warner) मैदानावर उतरवण्याचा ऑस्ट्रेलियाचा डाव फसला. पण, पुकोव्हस्की व लाबुशेन यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांचा आत्मविश्वासानं सामना करताना शतकी भागीदारी केली. रिषभ पंतनं ( Rishabh Pant) नं दोन झेल सोडून जीवदान दिलेल्या पुकोव्हस्कीनं पदार्पणातच अर्धशतक झळकावले. पाठोपाठ लाबुशेन यानंही अर्धशतक पूर्ण करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. स्टीव्ह स्मिथमध्येही प्रचंड आत्मविश्वास दिसत होता. पहिल्या दिवसाचा बराच खेळ पावसामुळे वाया गेला आणि ५५ षटकांचा खेळ झाला.

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियानं प्रथम फंलदाजीचा निर्णय घेतला. दुखापतीतून पूर्णपणे न सावरलेल्या वॉर्नरनं या सामन्यातून पुनरागमन केलं. पण, मोहम्मद सिरानजं त्याला पाच धावांवर माघारी जाण्यास भाग पाडले. चेतेश्वर पुजारानं स्लिपमध्ये सुरेख झेल टिपला. पुकोव्हस्की आणि लाबुशेन यांनी यजमानांचा डाव सावरला.  रिषभ पंतनं ( Rishabh Pant) दोन चुका करताना टीम इंडियाची डोकेदुखी वाढवली. त्यात भर म्हणजे जसप्रीत बुमराहकडून पुकोव्हस्कीला धावबाद करण्याची संधीही हुकली. पुकोव्हस्कीनं आत्मविश्वासानं भारतीय गोलंदाजांचा सामना केला. आर अश्विनच्या गोलंदाजीवर रिषभनं यष्टींमागे सोपा झेल टाकला. त्यावेळी पुकोव्हस्की २६ धावांवर खेळत होता.

 

पुकोव्हस्कीनं ११० चेंडूंत  ४ चौकारांच्या मदतीनं ६२ धावा केल्या. टीम इंडियाकडून कसोटीत पदार्पण करणाऱ्या नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) त्याला पायचीत केलं. लाबुशेन खेळपट्टीवर चिकटून होता. आर अश्विनच्या गोलंदाजीचा कसा सामना करायचा याचा अभ्यास करून स्टीव्ह स्मिथ मैदानावर उतरलेला दिसला. ऑस्ट्रेलियानं पहिल्या दिवसअखेर २ बाद १६६ धावा केल्या. लाबुशेन व स्मिथ यांनीही तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. स्मिथ ६४ चेंडूंत ३१ धावांवर नाबाद आहे, तर लाबुशेन १४९ चेंडूंत ८ चौकारांसह ६७ धावांवर खेळत आहे. 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाडेव्हिड वॉर्नरस्टीव्हन स्मिथ