India vs Australia, 3rd Test, Day 2 : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३३८ धावांच्या प्रत्युत्तरात टीम इंडियानं सॉलिड सुरुवात केली. रोहित शर्मा ( Rohit Sharma) व शुबमन गिल ( Shubman Gill) या नव्या जोडीनं टीम इंडियाला सकारात्मक सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७० धावांची भागीदारी केली. ही जोडी तोडण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून सर्वतोपरी प्रयत्न झाले आणि अखेरीस त्यांना यश आलेही. टीम इंडियानं दुसऱ्या दिवसअखेर दोन्ही सलामीवीर गमावले, परंतु दुसरा दिवस टीम इंडियाच्या नावावर राहिला. भारतानं पहिल्या सत्रआत ८३ धावांत ३, तर दुसऱ्या सत्रात ११५ धावांत ५ फलंदाज माघारी पाठवले.
विल पुकोव्हस्की ( ६२), मार्नस लाबुशेन ( ९१) यांच्या अर्धशतकी खेळीनंतर स्टीव्हन स्मिथनं ( १३१) शतकी खेळी केली. पण, जडेजानं ऑस्ट्रेलियाला धावांचा डोंगर उभारू दिला नाही. जडेजानं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या आणि स्मिथलाही त्यानं धावबाद केलं. मयांक अग्रवालच्या जागी संघात पुनरागमन करणाऱ्या रोहितनं युवा फलंदाज शुबमनसह ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना केला. डिसेंबर २०१०नंतर भारतीय सलामीवीरांना आशिया खंडाबाहेर प्रथमच २० हून अधिक षटकं खेळता आली. यापूर्वी वीरेंद्र सेहवाग व गौतम गंभीर यांनी सेंच्युरियन कसोटीत २९.३ षटकं खेळली होती. रोहित शर्माला बाद केल्याचा ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा आनंद क्षणात विरला; जाणून घ्या नेमकं काय झालं
२४व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर सिली पॉईंटला रोहितचा झेल टिपला गेला अन् अम्पायरनं त्याला बाद दिले. पण, रोहितनं लगेच DRS घेतला आणि त्यात चेंडू थायपॅडला लागल्याचे दिसत होते. त्यामुळे पंचांना निर्णय बदलावा लागला. पण, २७व्या षटकात जोश हेझलवूडनं भारताला धक्का दिलाच. रोहित व गिलची ७० धावांची भागीदारी संपुष्टात आली. हेझलवूडनं त्याच्याच गोलंदाजीवर रोहितचा झेल घेतला. रोहित २६ धावांवर बाद झाला. गिलनं कसोटीतील पहिले अर्धशतक पूर्ण केले. आत्मविश्वास त्याच्या खेळातून दिसत होता. मात्र, पॅट कमिन्सनं त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. कॅमेरून ग्रीननं त्याचा अप्रतिम झेल टिपला. गिलने १०१ चेंडूंत ८ चौकारांच्या मदतीनं ५० धावा केल्या. रोहित शर्माचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराक्रम; जगात कोणालाच नाही जमला हा विक्रम
भारतानं दुसऱ्या दिवसअखेर २ बाद ९६ धावा केल्या. अजिंक्य रहाणे ( ५) आणि चेतेश्वर पुजारा ( ९) धावांवर नाबाद आहेत. भारत अजून २४२ धावांनी पिछाडीवर आहे. क्वारंटाईनमध्ये काय केलंस?; भारतीय फलंदाजांना प्रश्नांवर प्रश्न, ऑसींचा रडीचा डाव Video