India vs Australia, 3rd Test : उमेश यादवची ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार; कोणाला संधी मिळणार?

India vs Australia, 3rd Test : जलदगती गोलंदाज उमेश यादव ( Umesh Yadav) यानं दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: December 31, 2020 10:34 AM2020-12-31T10:34:06+5:302020-12-31T10:34:43+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 3rd Test : Umesh Yadav ruled out of the Test series against Australia | India vs Australia, 3rd Test : उमेश यादवची ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार; कोणाला संधी मिळणार?

India vs Australia, 3rd Test : उमेश यादवची ऑस्ट्रेलिया मालिकेतून माघार; कोणाला संधी मिळणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Australia, 3rd Test : जलदगती गोलंदाज उमेश यादव ( Umesh Yadav) यानं दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून माघार घेतली आहे. पोटरीच्या दुखापतीमुळे त्यानं दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या डावात मैदान सोडले होते. त्यानं केवळ ४.३ षटकं फेकली होती. तिसऱ्या कसोटीपूर्वी उमेश तंदुरुस्त होईल, असा विश्वास कर्णधार अजिंक्य रहाणेनं व्यक्त केला होता. पण, आता उमेश मायदेशी परतणार आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांच्यानंतर टीम इंडियाला दुखापतीमुळे आणखी एका गोलंदाजाला मुकावे लागणार आहे. 
ANIनं उमेश यादवनं दौऱ्यातून माघार घेतल्याचे वृत्त दिले आहे. सूत्रांनी त्यांना सांगितले की, मायदेशात होणाऱ्या इंग्लंड मालिकेपूर्वी उमेश तंदुरुस्त होईल. मेलबर्न कसोटीनंतर त्याच्या दुखापतीचं स्कॅन करण्यात आलं आणि त्याचा रिपोर्ट आला. तो तिसऱ्या व चौथ्या कसोटीला मुकणार आहे. त्यामुळे त्याला मायदेशात पाठवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यानं मायदेशात जावं आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत ( NCA) दाखल होणे, अधिक फायद्याचे आहे.''

मर्यादित षटकांच्या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या टी नटराजनचा कसोटी संघात समावेश केला जाईल, असेही सूत्रांनी सांगितले. आता मर्यादित पर्याय उपलब्ध आहेत आणि त्यामुळे संघ व्यवस्थापनानं टी नटराजनला संघात दाखल करून घेण्याचे सुचवले आहे. इशांत शर्मा, मोहम्मद शमी यांच्यानंतर टीम इंडियासाठी हा मोठा धक्का आहे. 


उमेश यादवच्या अनुपस्थितीत तिसऱ्या कसोटीसाठी टी नटराजनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे. रोहित शर्माचे खेळण्याची शक्यताही अधिक आहे. हनुमा विहारीच्या अपयशानं लोकेश राहुलच्या अंतिम ११मधील मार्ग मोकळा झाला आहे.  तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवाल, हनुमा व उमेश ( दुखापतग्रस्त) यांच्या जागी रोहित शर्मा, लोकेश राहुल व टी नटराजन यांच्यासह अजिंक्य रहाणे अंतिम ११ खेळाडू घेऊन मैदानावर उतरणार आहे.

टीम इंडियाचे संभाव्य Playing XI - रोहित शर्मा, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, लोकेश राहुल, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, आर अश्विन, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, टी नटराजन
 

Web Title: India vs Australia, 3rd Test : Umesh Yadav ruled out of the Test series against Australia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.