मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एक योगायोग चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाला. चौथ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी चांगलीच जमली होती. पण रोहित शर्मा 95 धावांवर आऊट झाला आणि एक योगायोग पाहायला मिळाला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी संयत फलंदाजी केली. सुरुवातीला रोहितपेक्षा धवन हा आक्रमकपणे खेळत होता. पण स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी धावगती वाढवली. रोहित आता शतक झळकावणार असे वाटत असतानाच त्याला रिचर्ड्सनने बाद केले. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 95 धावा केल्या.
रोहित जेव्हा आऊट झाला तेव्हा भारताच्या 193 झाल्या होत्या. रांची येथील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियालाही 193 धावांची सलामी मिळाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिचं 93 धावांवर बाद झाला होता आणि त्यांना 193 धावांवरच पहिला धक्का बसला होता.मोहालीमध्ये सुरु असलेल्या भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी एक विक्रम केला आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडले आहे. सध्याच्या घडीला रोहित आणि शिखर हे या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर भारताची कोणती सलामीवीराची जोडी आहे, तुम्हाला माहिती आहे का...
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार प्रथम धावपट्टीवर उतरणार आहेत. या सामन्यासह मालिका जिंकण्याचा विराट प्लॅन टीम इंडियाचा असणार आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आजचा सामना रंगत आहे.
भारताकडून सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम सचिन आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. या दोघांनी 8227 धावा केल्या होत्या. या सामन्यात जेव्हा शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केले तेव्हा त्याने रोहितसह 4227 धावा केल्या होत्या.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणारी भारतीय जोडी
8227 सचिन तेंडुलकर - सौरव गांगुली4427 रोहित शर्मा - शिखर धवन (50*)4387 सचिन तेंडुलकर - वीरेंद्र सहवाग4332 राहुल द्रविड - सौरव गांगुली4328 रोहित शर्मा - विराट कोहली