India vs Australia 4th ODI: धोनीला पिछाडीवर टाकत रोहित बनला षटकारांचा बादशहा

या सामन्यात रोहितने दोन षटकार लगावले आणि धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 04:41 PM2019-03-10T16:41:18+5:302019-03-10T16:42:58+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 4th ODI: Rohit sharma break ms Dhoni's record of sixes | India vs Australia 4th ODI: धोनीला पिछाडीवर टाकत रोहित बनला षटकारांचा बादशहा

India vs Australia 4th ODI: धोनीला पिछाडीवर टाकत रोहित बनला षटकारांचा बादशहा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : हिट मॅन रोहित शर्माने चौथ्या एकदिवसीय सामन्यात 95 धावांची  दमदार खेळी साकारली. या 95 धावा करताना रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले आहे. 

रोहितला हिट मॅन म्हटले जाते. कारण स्थिरस्थावर झाल्यावर तो भन्नाट फलंदाजी करतो. रोहितचे षटकार तर पाहण्यासारखे असतात. रोहितच्या षटकारांमध्ये अचूक टायमिंग असते. या सामन्यात रोहितने दोन षटकार लगावले आणि धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 217 षटकार होता. या सामन्यात रोहितने दोन षटकार लगावले आणि धोनीला मागे टाकले. कारण आता रोहितच्या नावावर 218 षटकार झाले आहेत.

भारताकडून सर्वाधिक षटकार फटकावणारे फलंदाज:
218 रोहित शर्मा (63*)
217 महेंद्रसिंग धोनी
195 सचिन तेंडुलकर
189 सौरव गांगुली
153 युवराज सिंग
131 वीरेंद्र सेहवाग

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एक योगायोग चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाला. चौथ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी चांगलीच जमली होती. पण रोहित शर्मा 95 धावांवर आऊट झाला आणि एक योगायोग पाहायला मिळाला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी संयत फलंदाजी केली. सुरुवातीला रोहितपेक्षा धवन हा आक्रमकपणे खेळत होता. पण स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी धावगती वाढवली. रोहित आता शतक झळकावणार असे वाटत असतानाच त्याला रिचर्ड्सनने बाद केले. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 95 धावा केल्या.

रोहित जेव्हा आऊट झाला तेव्हा भारताच्या 193 झाल्या होत्या. रांची येथील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियालाही 193 धावांची सलामी मिळाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिचं 93 धावांवर बाद झाला होता आणि त्यांना 193 धावांवरच पहिला धक्का बसला होता.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणारी भारतीय जोडी

8227 सचिन तेंडुलकर - सौरव गांगुली
4427 रोहित शर्मा - शिखर धवन (50*)
4387 सचिन तेंडुलकर - वीरेंद्र सहवाग
4332 राहुल द्रविड - सौरव गांगुली
4328 रोहित शर्मा - विराट कोहली

Web Title: India vs Australia 4th ODI: Rohit sharma break ms Dhoni's record of sixes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.