मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : आतापर्यंतच्या तिन्ही सामन्यांमध्ये शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची बॅट जास्त बोलली नव्हती. पण ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या सामन्यामध्ये धवन आणि रोहित यांच्या फटकेबाजीचा धुमधडाका पाहायला मिळाला. या दोघांच्या 193 धावांच्या सलामीच्या जोरावर भारताने प्रथम फलंदाजी करताना 358 धावा केल्या.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी संयत फलंदाजी केली. सुरुवातीला रोहितपेक्षा धवन हा आक्रमकपणे खेळत होता. पण स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी धावगती वाढवली. रोहित आता शतक झळकावणार असे वाटत असतानाच त्याला रिचर्ड्सनने बाद केले. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 95 धावा केल्या. रोहित बाद झाल्यावरही धवनने आपली फटकेबाजी कायम ठेवली आणि वनडेमधील 16वे शतक झळकावले. धवनने यावेळी 115 चेंडूंत 18 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 143 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.
हिट मॅन रोहित शर्माने चौथ्या एकदिवसीय सामन्यात 95 धावांची दमदार खेळी साकारली. या 95 धावा करताना रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले आहे.
रोहितला हिट मॅन म्हटले जाते. कारण स्थिरस्थावर झाल्यावर तो भन्नाट फलंदाजी करतो. रोहितचे षटकार तर पाहण्यासारखे असतात. रोहितच्या षटकारांमध्ये अचूक टायमिंग असते. या सामन्यातही रोहितने दोन षटकार लगावले आणि धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 217 षटकार होता. या सामन्यात रोहितने दोन षटकार लगावले आणि धोनीला मागे टाकले. कारण आता रोहितच्या नावावर 218 षटकार झाले आहेत.
भारताकडून सर्वाधिक षटकार फटकावणारे फलंदाज:218 रोहित शर्मा (63*)217 महेंद्रसिंग धोनी195 सचिन तेंडुलकर189 सौरव गांगुली153 युवराज सिंग131 वीरेंद्र सेहवाग
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एक योगायोग चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाला. चौथ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी चांगलीच जमली होती. पण रोहित शर्मा 95 धावांवर आऊट झाला आणि एक योगायोग पाहायला मिळाला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी संयत फलंदाजी केली. सुरुवातीला रोहितपेक्षा धवन हा आक्रमकपणे खेळत होता. पण स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी धावगती वाढवली. रोहित आता शतक झळकावणार असे वाटत असतानाच त्याला रिचर्ड्सनने बाद केले. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 95 धावा केल्या.
रोहित जेव्हा आऊट झाला तेव्हा भारताच्या 193 झाल्या होत्या. रांची येथील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियालाही 193 धावांची सलामी मिळाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिचं 93 धावांवर बाद झाला होता आणि त्यांना 193 धावांवरच पहिला धक्का बसला होता.