Join us  

India vs Australia 4th ODI: टर्नर ठरला टर्निंग पॉइंट, ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय

शिखर धवनचे शतक आणि रोहित शर्मा यांच्या 193 धावांच्या सलामीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे 359 धावांचे आव्हान ठेवले होते.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 9:23 PM

Open in App

मोहाली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाकडून फक्त दुसरा सामना खेळणारा अॅश्टन टर्नरची फलंदाजी ही या लढतीतील टर्निंग पॉइंट ठरली. त्याचबरोबर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 192 धावांची दमदार भागीदारी विजयासाठी महत्वाची ठरली, भारताने प्रथम फलंदाजी करताना 358 धावा केल्या होत्या. शिखर धवनचे शतक आणि रोहित शर्मा यांच्या 193 धावांच्या सलामीच्या जोरावर भारताने ऑस्ट्रेलियापुढे 359 धावांचे आव्हान ठेवले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर चार विकेट्स राखून विजय मिळवत मालिकेत 2-2 अशी बरोबरी केली आहे.

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 2 बाद 12 अशी दयनीय अवस्था होती. पण त्यानंतर पीटर हँड्सकॉम्ब आणि उस्मान ख्वाजा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 192 धावांची दमदार भागीदारी रचली. पण जसप्रीत बुमराने ख्वाजाला बाद केले आणि ही जोडी फोडली. पण त्यानंतर हँड्सकॉम्बने संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आणि पहिले शतक झळकावले. हँड्सकॉम्बने आठ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 117 धावा केल्या. हँड्सकॉम्ब बाद झाल्यावर फक्त दुसरा सामना खेळणाऱ्या अॅश्टन अगरने धडाकेबाज फटकेबाजी करत आपले पहिले अर्धशतक पूर्ण केले. टर्नरने या सामन्यात 43 चेंडूंत पाच चौकार आणि सहा षटकारांच्या जोरावर 83 धावांची महत्वाची खेळी साकारली.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी संयत फलंदाजी केली. सुरुवातीला रोहितपेक्षा धवन हा आक्रमकपणे खेळत होता. पण स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी धावगती वाढवली. रोहित आता शतक झळकावणार असे वाटत असतानाच त्याला रिचर्ड्सनने बाद केले. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 95 धावा केल्या. रोहित बाद झाल्यावरही धवनने आपली फटकेबाजी कायम ठेवली आणि वनडेमधील 16वे शतक झळकावले. धवनने यावेळी 115 चेंडूंत 18 चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर 143 धावांची धडाकेबाज खेळी साकारली.

हिट मॅन रोहित शर्माने चौथ्या एकदिवसीय सामन्यात 95 धावांची  दमदार खेळी साकारली. या 95 धावा करताना रोहितने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला पिछाडीवर टाकले आहे. 

रोहितला हिट मॅन म्हटले जाते. कारण स्थिरस्थावर झाल्यावर तो भन्नाट फलंदाजी करतो. रोहितचे षटकार तर पाहण्यासारखे असतात. रोहितच्या षटकारांमध्ये अचूक टायमिंग असते. या सामन्यातही रोहितने दोन षटकार लगावले आणि धोनीचा विक्रम मोडीत काढला आहे. यापूर्वी एकदिवसीय क्रिकेटमध्ये धोनीच्या नावावर 217 षटकार होता. या सामन्यात रोहितने दोन षटकार लगावले आणि धोनीला मागे टाकले. कारण आता रोहितच्या नावावर 218 षटकार झाले आहेत.

भारताकडून सर्वाधिक षटकार फटकावणारे फलंदाज:218 रोहित शर्मा (63*)217 महेंद्रसिंग धोनी195 सचिन तेंडुलकर189 सौरव गांगुली153 युवराज सिंग131 वीरेंद्र सेहवाग

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एक योगायोग चौथ्या एकदिवसीय सामन्यात पाहायला मिळाला. चौथ्या एकदिवसीय सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांची जोडी चांगलीच जमली होती. पण रोहित शर्मा 95 धावांवर आऊट झाला आणि एक योगायोग पाहायला मिळाला.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित आणि धवन यांनी यावेळी संयत फलंदाजी केली. सुरुवातीला रोहितपेक्षा धवन हा आक्रमकपणे खेळत होता. पण स्थिरस्थावर झाल्यावर रोहितने आपल्या नेत्रदीपक फटक्यांनी धावगती वाढवली. रोहित आता शतक झळकावणार असे वाटत असतानाच त्याला रिचर्ड्सनने बाद केले. रोहितने 92 चेंडूंत सात चौकार आणि दोन षटकारांच्या जोरावर 95 धावा केल्या.

रोहित जेव्हा आऊट झाला तेव्हा भारताच्या 193 झाल्या होत्या. रांची येथील तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियालाही 193 धावांची सलामी मिळाली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियाचा कर्णधार आरोन फिचं 93 धावांवर बाद झाला होता आणि त्यांना 193 धावांवरच पहिला धक्का बसला होता.मोहालीमध्ये सुरु असलेल्या  भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताच्या सलामीवीरांनी एक विक्रम केला आहे. रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी माजी सलामीवीर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग यांना पिछाडीवर सोडले आहे. सध्याच्या घडीला रोहित आणि शिखर हे या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत. या यादीमध्ये पहिल्या स्थानावर भारताची कोणती सलामीवीराची जोडी आहे, तुम्हाला माहिती आहे का...

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे टीम इंडियाचे शिलेदार प्रथम धावपट्टीवर उतरणार आहेत. या सामन्यासह मालिका जिंकण्याचा विराट प्लॅन टीम इंडियाचा असणार आहे. मोहाली येथील पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर आजचा सामना रंगत आहे. 

भारताकडून सर्वाधिक धावा बनवण्याचा विक्रम सचिन आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांच्या नावावर आहे. या दोघांनी 8227 धावा केल्या होत्या. या सामन्यात जेव्हा शिखर धवनने अर्धशतक पूर्ण केले तेव्हा त्याने रोहितसह 4227 धावा केल्या होत्या.

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन बनवणारी भारतीय जोडी

8227 सचिन तेंडुलकर - सौरव गांगुली4427 रोहित शर्मा - शिखर धवन (50*)4387 सचिन तेंडुलकर - वीरेंद्र सहवाग4332 राहुल द्रविड - सौरव गांगुली4328 रोहित शर्मा - विराट कोहली

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाशिखर धवनरोहित शर्मा