India vs Australia, 4th Test Day 5 : ये दीवार तुटेगी नही!; चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी ऑसींचा रडीचा डाव, Video

India vs Australia, 4th Test : ऑसी गोलंदाजांनी पुजाराला जायबंदी करण्याचा डाव कायम ठेवला. जोश हेझलवूडचा एक चेंडू पुजाराच्या अंगठ्यावर एवढ्या जोरात आदळला की त्यानं बॅट फेकली आणि अंगठा पकडून मैदानावर बसला. तो रडायलाच आला होता, पण संघासाठी प्राथमिक उपचार घेऊन तो पुन्हा उभा राहिला. 

By स्वदेश घाणेकर | Published: January 19, 2021 09:39 AM2021-01-19T09:39:25+5:302021-01-19T09:43:53+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 4th Test : Cheteshwar Pujara hit on the body, fingers, helmet on Day 5,  he is still batting,  Video | India vs Australia, 4th Test Day 5 : ये दीवार तुटेगी नही!; चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी ऑसींचा रडीचा डाव, Video

India vs Australia, 4th Test Day 5 : ये दीवार तुटेगी नही!; चेतेश्वर पुजाराला बाद करण्यासाठी ऑसींचा रडीचा डाव, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देशुबमन गिल व चेतेश्वर पुजारा यांच्या शतकी भागीदारीनं टीम इंडियाला सावरलेशुबमन गिल १४६ चेंडूंत ९१ धावांवर माघारी

India vs Australia, 4th Test Day 5 : रोहित शर्मा ( Rohit Sharma) पहाटेच बाद झाल्यानंतर टीम इंडियाचा डाव गडगडायला वेळ लागणार नाही, असा अंदाज चुकीचा ठरला. शुबमन गिल ( Shubman Gill) आणि चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) यांनी खेळपट्टीवर नांगर रोवला आणि शतकी भागीदारीसह टीम इंडियाचा डाव सावरला. गिल जोरदार फटकेबाजी करत होता, तर पुजारा एका बाजूनं विकेट टिकवून खेळत होता. पुजाराला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी रडीचा डाव खेळण्यास सुरुवात केली. त्यांनी पुजाराच्या शरिरावर चेंडूचा मारा करण्यास सुरूवात केली. हात, छाती, खांदा, अंगठा यावर मार सहन करून प्राथमिक उपचारानंतर पुजारा पुन्हा ऑसींसमोर उभा राहिला. 

गॅबा कसोटीच्या पाचव्या दिवशी ३२८ धावांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला पहाटेच पहिला धक्का बसला. सलामीवीर  पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर रोहित ७ धावांवर यष्टिरक्षक टीम पेनच्या हाती झेल देऊन माघारी परतला. गॅबाची खेळपट्टी पाहता हे लक्ष्य सोपं नक्कीच नाही. त्यामुळे टीम इंडियाच्या फलंदाजांचा कस लागणे हे निश्चित आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर संधी मिळालेल्या गिलनं ऑसींचा समाचार घेतला. त्याचे फटके पाहून सारेच अवाक् झाले. कमिन्स, हेझलवूड यांचा चेंडू बॅकफूटवर जाऊन कव्हरच्या दिशेनं तो सहज टोलवत होता. 

गिलनं या दौऱ्यातील दुसरे अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी बाऊन्सरचा मारा करून पुजाराला जायबंदी करण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याचा फार काही उपयोग झाला नाही. लंच ब्रेकपूर्वीच्या अखेरच्या चेंडूवर पुजारा थोडक्यात वाचला, ऑसींनी DRS घेतला असता तर कदाचित त्यालाही तंबूत परतावे लागले असते. शतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या गिलला माघारी जातानाभारतीयांनी हळहळ व्यक्त केली. इतकी सुरेख फटकेबाजी करणाऱ्या गिलचे शतक व्हायला पाहिजे होते, असे सर्वांना मनोमन वाटत होते. गिल १४६ चेंडूंत ८ चौकार व २ षटकारांसह ९१ धावांवर बाद झाला. त्यानं पॅट कमिन्सच्या एका षटकात २० धावा चोपून काढल्या.

गिलनंतर आलेल्या कर्णधार अजिंक्य रहाणेनेही आक्रमक खेळ केला, परंतु ऑसी गोलंदाजांनी पुजाराला जायबंदी करण्याचा डाव कायम ठेवला. जोश हेझलवूडचा एक चेंडू पुजाराच्या अंगठ्यावर एवढ्या जोरात आदळला की त्यानं बॅट फेकली आणि अंगठा पकडून मैदानावर बसला. तो रडायलाच आला होता, पण संघासाठी प्राथमिक उपचार घेऊन तो पुन्हा उभा राहिला. 











Web Title: India vs Australia, 4th Test : Cheteshwar Pujara hit on the body, fingers, helmet on Day 5,  he is still batting,  Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.