India vs Australia, 4th Test : विचित्र फटका मारून माघारी परतला रिषभ पंत; टीम इंडिया संकटात, Video 

India vs Australia, 4th Test Day 3 : भारताचे सहा फलंदाज माघारी परतले आहेत. वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर खेळपट्टीवर खिंड लढवत आहेत. भारत अजूनही १५० धावांनी पिछाडीवर आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: January 17, 2021 09:34 AM2021-01-17T09:34:48+5:302021-01-17T09:35:45+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia, 4th Test Day 3 : Cameron Green grabs a smart catch and Rishabh Pant has to go, Video | India vs Australia, 4th Test : विचित्र फटका मारून माघारी परतला रिषभ पंत; टीम इंडिया संकटात, Video 

India vs Australia, 4th Test : विचित्र फटका मारून माघारी परतला रिषभ पंत; टीम इंडिया संकटात, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताचे आघाडीचे सहा फलंदाज माघारी वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर खेळपट्टीवर खिंड लढवत आहेत

India vs Australia, 4th Test Day 3 : भारतीय संघानं तिसऱ्या दिवसाच्या सकाळच्या सत्रात दोन महत्त्वाच्या विकेट्स गमावल्यानंतर गाडी रुळावर येईल असे वाटत होते.  स्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी चतूर खेळ करताना चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) व अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) यांना माघारी पाठवले. मयांक अग्रवाल ( Mayank Agarawal) पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. त्यात रिषभ पंतही ( Rishabh Pant) विचित्र फटका मारून माघारी परतल्यानं टीम इंडिया संकटात सापडली आहे.  

दुसऱ्या दिवसाची जवळपास ३५ षटकं पावसामुळे वाया गेल्यानं २ बाद ६२ धावांवर खेळ थांबवावा लागला होता. तिसऱ्या दिवसावरही पावसाचं सावट आहे, परंतु पहिल्या सत्रात त्याने त्रास दिलेला नाही. पुजारा व अजिंक्य यांनी संयमी सुरुवात करताना ४५ धावा जोडल्या आणि संघाच्या फलकावर १०५ धावा असताना टीम इंडियाला तिसऱ्या दिवसाचा पहिला धक्का बसला. चेतेश्वर पुजारा ९४ चेंडूंत २ चौकारांच्या मदतीनं २५ धावा करून जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर बाद झाला. तत्पूर्वी अजिंक्यला मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर दोन जीवदान मिळाले. 

स्टार्कनं टाकलेला चेंडू अजिंक्यच्या बॅटला एज लागून गल्लीच्या दिशेनं गेला, सुदैवानं तेथे फिल्डर नसल्यानं त्याला चौकार मिळाले. पण, ५५व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर त्याला नशिबाची साथ मिळाली नाही. मॅथ्यू वेडनं कॅच घेत अजिंक्यला माघारी जाण्यास भाग पाडले. अजिंक्य ९३ चेंडूंत ३ चौकारांच्या मदतीनं ३७ धावांवर माघारी परतला. लंच ब्रेकनंतरच्या पहिल्याच षटकात मयांक ( ३८) जोश हेझलवूडनं माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला.


तिसऱ्या कसोटीतील नायक रिषभ पंत आक्रमक अंदाजात दिसला, परंतु हेझलवूडनं रणनीती आखून त्याला बाद केले. हेझलवूडनं पंतच्या शरिरावर चेंडूंचा मारा केला आणि त्यापैकी एका चेंडूवर पंतला विचित्र फटका मारणे भाग पडले. गल्लीमध्ये उभ्या असलेल्या कॅमेरून ग्रीननं झेल घेत पंतला ( २३) माघारी जाण्यास भाग पाडले. 


Web Title: India vs Australia, 4th Test Day 3 : Cameron Green grabs a smart catch and Rishabh Pant has to go, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.