India vs Australia, 4th Test : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आलेल्या टीम इंडियाच्या दुखापतग्रस्त खेळाडूंची यादी वाढतच चालली आहे. ब्रिस्बेन कसोटीत तंदुरुस्त १४ जणांमधून टीम इंडियाला अंतिम ११ निवडावे लागले. त्यातही नवदीप सैनीनं ( Navdeep Saini) मांडीचे स्नायू ताणले गेल्यामुळे मैदान सोडले आणि BCCIची वैद्यकिय टीम त्याच्यावर प्राथमिक उपचार करत आहे. या सामन्यात टीम इंडिया अनुनभवी गोलंदाज घेऊन मैदानावर उतरली आहे. त्यात सैनीची दुखापत म्हणजे टीम इंडियासमोर आलेलं मोठं संकटही. अशात बदली खेळाडू म्हणून मैदानावर आलेल्या पृथ्वी शॉ ( Prithvi Shaw) नं फेकलेला चेंडू रोहित शर्मा ( Rohit Sharma) याच्या उजव्या हातावर लागल्यानं धाकधुक वाढली आहे.
ऑस्ट्रेलियाच्या प्लेईंग ११मधील गोलंदाजांच्या नावावर एकूण १०४६ विकेट्स आहेत, तर टीम इंडियाच्या प्लेईंग ११ने फक्त १३ विकेट्स घेतल्या आहेत. त्यापैकी दोन विकेट हा रोहित शर्माच्या नावावर आहेत. आजच्या सामन्यात टीम इंडियाकडून टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांनी पदार्पण केलं. दोन कसोटीचा अनुभव असलेल्या सिराजनं पहिल्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर वॉर्नरला बाद केलं. ९व्या षटकात अजिंक्यनं शार्दूल ठाकूरच्या हाती चेंडू दिला आणि त्यानं पहिल्याच चेंडूवर मार्कस हॅरीसला माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथ व मार्नस लाबुशेन ही सेट जोडी वॉशिंग्टन सुंदरनं तोडली. स्मिथ व लाबुशेन ही जोडी टीम इंडियासाठी डोकेदुखी ठरत होती. या जोडीनं १५६ चेंडू खेळून काढताना ७० धावांची भागीदारी केली.
cवॉशिंग्टनच्या गोलंदाजीवर लाबुशेन चोरटी धाव घेण्यासाठी धावला, त्यावेळी पृथ्वीनं चेंडू गोलंदाजाच्या दिशेनं भिरकावला, परंतु तो रोहित शर्माच्या हातावर जाऊन आदळला. आता रोहितच्या दुखापतीचा धक्का सहन करावा लागतो की काय, अशी चिंता सतावू लागली आहे. पण, रोहित तंदुरुस्त आहे.
Web Title: India vs Australia, 4th Test : Prithvi Shaw trying a direct hit, but Rohit Sharma is in the way, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.