Join us  

India vs Australia, 4th Test : रोहित शर्मानं घेतली भारी कॅच; शार्दूल ठाकूरनं दिले धक्क्यांवर धक्के, Video

India vs Australia, 4th Test Day 2 : ५ बाद २७४ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी टीम पेन व कॅमेरून ग्रीन ही सेट जोडी मैदानावर उतरली. भारतीय गोलंदाजांचा ते चांगलाच समाचार घेतील असेच चित्र सुरुवातीला दिसत होते.

By स्वदेश घाणेकर | Published: January 16, 2021 7:11 AM

Open in App

India vs Australia, 4th Test : भारताच्या अनुनभवी गोलंदाजांसमोरही ऑस्ट्रेलियाचे तगडे फलंदाज ढेपाळताना पाहायला मिळत आहेत. चौथ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात शार्दूल ठाकूरने ( Shardul Thakur) दमदार गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला धक्क्यांमागून धक्के दिले. वॉशिंग्टन सूंदरनेही ( Washington Sunder) एक विकेट घेत त्याला चांगली साथ दिली. पहिल्या दिवशी मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये अफलातून झेल घेणाऱ्या रोहित शर्माने ( Rohit Sharma) आजही भारी कॅच घेतली. ( sharp catch by Rohit Sharma) 

५ बाद २७४ धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी टीम पेन व कॅमेरून ग्रीन ही सेट जोडी मैदानावर उतरली. भारतीय गोलंदाजांचा ते चांगलाच समाचार घेतील असेच चित्र सुरुवातीला दिसत होते. टीम पेननं अर्धशतक पूर्ण करून त्याचे मनसुबे स्पष्ट केले. पण, शार्दूल ठाकूरनं त्याच्या खेळीला ब्रेक लावला. अप्रतिम आऊटसिंग चेंडूवर पेनला खेळण्यास भाग पाडले आणि दुसऱ्या स्लीपमध्ये उभ्या असलेल्या रोहितनं शार्प कॅच घेतला. पेन १०४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावांवर माघारी परतला. २०१०-११नंतर पेननं एकाच कसोटी मालिकेत प्रथमच दोन अर्धशतकी खेळी केल्या.

शार्दूलच्या धक्क्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं दुसरा सेट फलंदाज कॅमेरून ग्रीनचा त्रिफळा उडवला. ग्रीन ४७ धावांवर माघारी परतला. त्यानंतर शार्दूलनं पॅट कमिन्स ( पायचीत) व सुंदरनं नॅथन लियॉन ( त्रिफळा) यांना बाद केले. ऑस्ट्रेलियाचे ९ फलंदाज ३५४ धावांवर माघारी परतले होते. ( another batsman bowled by Washington Sundar) 

पाहा व्हिडीओ...

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माशार्दुल ठाकूरवॉशिंग्टन सुंदर