ब्रिस्बेन: पहिल्या कसोटीत अवघ्या ३६ धावांत लोटांगण घालणाऱ्या, त्यानंतर दुखापतींनी ग्रासलेल्या, अनुनभवी खेळाडूंसह मैदानावर उतरलेल्या भारतीय संघानं शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत करत इतिहास रचला आहे. शेवटच्या आणि निर्णायक कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियानं दिलेल्या ३२८ धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग करत भारतानं ऐतिहासिक विजयाची नोंद केली. पहिल्या कसोटीनंतर कर्णधार विराट कोहली माघारी परतल्यावर भारतीय संघ कमकुवत होईल, ०-४ नं पराभूत होईल, अशी भाकितं ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूंनी केली होती. मात्र कर्णधार रहाणेच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघ अजिंक्य राहिला.ऍडलेडमध्ये मानहानीकारक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघाला दुखापतींनी ग्रासलं. मात्र त्यानंतरही भारतीय संघानं कणखरपणा दाखवला. दुसऱ्या कसोटीत विजय आणि तिसरी कसोटी अनिर्णित राखून भारतीय संघ चौथ्या कसोटीसाठी ब्रिस्बेनला पोहोचला. गॅबाच्या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघ गेल्या ३२ वर्षांत एकदाही पराभूत झालेला नाही आणि भारतीय संघ या मैदानात कधीही जिंकलेला नाही, असा इतिहास. मात्र रहाणेच्या संघानं कांगारुंना धूळ चारत नवा इतिहास लिहिला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- India vs Australia 4th Test: अनोखा योगायोग! जेव्हा कोहलींच्या घरी पाळणा हलतो; तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ गॅबावर हरतो
India vs Australia 4th Test: अनोखा योगायोग! जेव्हा कोहलींच्या घरी पाळणा हलतो; तेव्हा ऑस्ट्रेलियन संघ गॅबावर हरतो
India vs Australia 4th Test: चौथ्या कसोटीसह मालिका टीम इंडियाच्या खिशात; मायदेशात ऑस्ट्रेलिया पराभूत
By कुणाल गवाणकर | Published: January 19, 2021 7:58 PM