India vs Australia, 4th Test Day 3 : प्रतिस्पर्धी गोलंदाजांसमोर सहज लोटांगण घालणाऱ्या भारताच्या शेपटानं आज कांगारूंना चांगलेच झोडले. तळाच्या चार विकेट्सनं १५० धावा जोडून टीम इंडियाला सामन्यात जबरदस्त कमबॅक करून दिले. वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी ऑसी गोलंदाजांना धु धु धुतले. या दोघांनी ऑसींचा आत्मविश्वास फाजील ठरवला. या दोघांनी ७व्या विकेटसाठी विक्रमी १२३ धावांची भागीदारी केली. या दोघांचे कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) कौतुक केलं.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे ( ३७) व चेतेश्वर पुजारा ( २५) यांना माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. मयांक अग्रवाल ( Mayank Agarawal) पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. त्यात रिषभ पंतही ( Rishabh Pant) विचित्र फटका मारून माघारी परतल्यानं टीम इंडिया संकटात सापडली. मयांक ३८, तर रिषभ २३ धावांवर बाद झाले. फलकावर १८६ धावा असताना रिषभ माघारी परतला. भारत १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि ऑस्ट्रेलिया शेपूट झटपट गुंडाळेल असेच वाटत होते.
पण, सुंदर आणि ठाकूर यांनी अनपेक्षित कामगिरी केली. दोघांनी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची विक्रमी भागीदारी केली. या दोघांनी ३६ षटकं खेळून काढली. पॅट कमिन्सनंही ही भागीदारी तोडली. ११५ चेंडूंत ९ चौकार व २ षटकार मारून ६७ धावा करणारा शार्दूलला त्यानं बाद केलं. सुंदर १४४ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ६२ धावांवर बाद झाला. शार्दूल व सुंदर हे खेळपट्टीवर होते, तोपर्यंत भारत १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि या दोघांमुळे ही पिछाडी ४० धावांपर्यंत कमी झाली. भारताचा पहिला डाव ३३६ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाला नाममात्र ३३ धावांची आघाडी घेता आली. जोश हेझलवूडनं सर्वाधिक ५ विकेट्स घेतल्या. मिचेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
सुंदर व ठाकूरच्या कामगिरीवर विराट कोहलीनं कौतुकाचं ट्विट केलं. त्यानं लिहिलं की,''वॉशिंग्टन सुंदर आणि शार्दूल ठाकूर तुम्ही अविश्वसनीय खेळ केलात. यालाच कसोटी क्रिकेट म्हणतात. तुला परत मानलं रे ठाकूर!''
Web Title: India vs Australia, 4th Test : Virat Kohli applauds Washington Sundar and Shardul Thakur from India
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.