India vs Australia 5th ODI : भारतावर 2015 नंतर प्रथमच ओढावली नामुष्की, मालिका विजयाची परंपरा खंडीत

India vs Australia 5th ODI : भारतीय संघाला पाचव्या वन डे सामन्यात प्रयोग करणे अगंलट आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 08:58 PM2019-03-13T20:58:49+5:302019-03-13T21:14:02+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia 5th ODI : Australia beat India by 35 runs; this is India's first ODI series lost at home after 2015 | India vs Australia 5th ODI : भारतावर 2015 नंतर प्रथमच ओढावली नामुष्की, मालिका विजयाची परंपरा खंडीत

India vs Australia 5th ODI : भारतावर 2015 नंतर प्रथमच ओढावली नामुष्की, मालिका विजयाची परंपरा खंडीत

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाला पाचव्या वन डे सामन्यात प्रयोग करणे अगंलट आला. मालिका विजयासाठीच्या महत्त्वाच्या सामन्यात भारताने संघात दोन बदल केले. ऑस्ट्रेलियाच्या 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांची झालेली हाराकिरी पाहून हे बदल महागात पडल्याचे प्रकर्षाने जाणवले. ऑस्ट्रेलियाने 0-2 अशा पिछाडीवरून मुसंडी मारताना ही मालिका 3-2 अशी खिशात घातली. 2015 नंतर भारतीय संघावर प्रथमच घरच्या मैदानावर मालिका गमवण्याची नामुष्की ओढावली. ऑस्ट्रेलियाने 35 धावांनी हा सामना जिंकला. त्यांच्या 272 धावांचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 237 धावांवर माघारी परतला. 



 

उस्मान ख्वाजा ( 100) आणि पीटर हँड्सकोम्ब ( 52) यांच्या फटकेबाजीनंतर अन्य फलंदाजांनी पत्करलेल्या हाराकिरीमुळे ऑस्ट्रेलियाला 9 बाद 272 धावाच करता आल्या. भारताच्या जसप्रीत बुमराने सर्वात प्रभावी गोलंदाजी करताना ऑसींच्या धावगतीवर चाप लगावला. पण, त्याच्या अखेरच्या दोन षटकांत ऑस्ट्रेलियाने ती कसर भरून काढली. भुवनेश्वर कुमारने तीन, तर रवींद्र जडेजा व मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. कुलदीप यादव (74) सर्वात महागडा गोलंदाज ठरला.  

पाचव्या वन डे सामन्यात विजयासाठी भारताला 273 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे. मालिका विजयासाठी महत्त्वाच्या या सामन्यात भारताची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर शिखर धवन (12) त्वरित माघारी परतला. त्यामुळे भारतीय संघावर दडपण आले होते. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्सने भारताला पहिला धक्का दिला, परंतु त्यानंतर रोहित शर्मा व कर्णधार विराट कोहली यांनी संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. शिखर धवन, विराट कोहली आणि रिषभ पंत माघारी परतल्यानंतर रोहितने सामन्याची जबाबदारी खांद्यावर घेताना अर्धशतक झळकावले. पण, रोहित माघारी परतताच भारताचा डाव गडगडला.

अॅडम झम्पाने एकाच षटकात रोहित व रवींद्र जडेजाला बाद करून ऑस्ट्रेलियाला विजयासमीप नेले. केदार जाधव एका बाजूनं तळाच्या गोलंदाजांना सोबत घेऊन खिंड लढवत होता, परंतु त्याचे प्रयत्न अपयशी ठरले. केदारला भुवनेश्वर कुमारने तोलामोलाची साथ दिली. या दोघांनी सातव्या विकेटसाठी 91 धावा जोडल्या. भुवीनं 46, तर केदारनं 44 धावा केल्या. पॅट कमिन्सने एका षटकात दोघांना बाद केले.

भारतीय संघाला घरच्या प्रेक्षकांसमोर 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेनं नमवलं होतं. त्यानंतर भारताने न्यूझीलंड ( 2016 व 2017), ऑस्ट्रेलिया, इंग्लंड व श्रीलंका ( 2017) आणि वेस्ट इंडिज ( 2018) यांना नमवले. पण, विजयाची ही मालिका ऑस्ट्रेलियाने खंडीत काढली. 
 

Web Title: India vs Australia 5th ODI : Australia beat India by 35 runs; this is India's first ODI series lost at home after 2015

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.