नवी दिल्ली, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : केदार जाधव आणि भुवनेश्वर कुमार यांनी पाचव्या वन डे सामन्यात भारताच्या विजयासाठी कडवी झुंज दिली, परंतु ऑस्ट्रेलियानं भारतीय संघाला 35 धावांनी नमवून मालिका 3-2 अशी जिंकली. घरच्या मैदानावर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला प्रथमच मालिका पराभव पत्करावा लागला. भारतीय संघाने पहिले दोन सामने जिंकून आघाडी घेतली होती, परंतु कांगारूंनी जोरदार कमबॅक करताना ऐतिहासिक विजय मिळवला. 2009 नंतर ऑस्ट्रेलियाने प्रथमच भारतात वन डे मालिका जिंकण्याचा पराक्रम केला.
ऑस्ट्रेलियाने दहा वर्षांनंतर भारताला वन डे मालिकेत नमवलेऑस्ट्रेलियाने 2009 साली भारतात वन डे मालिकेत 4-2 असा विजय मिळवला होता. त्यानंतर 2010 ( 0-1), 2013 ( 2-3) आणि 2017 (1-4) साली ऑस्ट्रेलियाला पराभव पत्करावा लागला होता. आतापर्यंत केवळ चारच संघांना 0--2 अशा पिछाडीवरून वन डे मालिका जिंकता आल्या आहेत. यात दक्षिण आफ्रिकेने ( पाकिस्तान 2003 आणि इंग्लंड 2016) दोन वेळा असा पराक्रम केला आहे, तर पाकिस्तान ( भारत 2015) आणि बांगलादेश ( झिम्बाब्वे 2005) यांनी प्रत्येकी एक वेळा अशी कामगिरी केली आहे. या यादित आता ऑस्ट्रेलियाचा संघ दाखल झाला आहे.