India vs Australia : भारतीय संघानं ट्वेंटी-20 मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यात टीम इंडियानं ६ विकेट्स राखून सहज विजय मिळवला. १९४ धावांचा पाठलाग करताना शिखर धवननं संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यानंतर विराटनं सुसाट खेळ केला आणि हार्दिक पांड्यानं ऑसी गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. हार्दिकनं पुन्हा एकदा मॅच फिनिशरची भूमिका बजावली. या सामन्यात कर्णधार विराट कोहलीनं ( Virat Kohli) RCBचा संघसहकारी एबी डिव्हिलियर्स याच्या स्कूप फटक्याची कॉपी केली. त्यावर दक्षिण आफ्रिकेच्या माजी फलंदाजानं प्रतिक्रिया दिली.
प्रभारी कर्णधार मॅथ्यू वेड ( ५८) आणि स्टीव्हन स्मिथ ( ४६) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं ५ बाद १९४ धावा केल्लया. टी नटराजननं २० धावांत २ विकेट्स घेतल्या. धावांचा पाठलाग करताना हार्दिक पांड्यानं नाबाद ४२ धावा चोपून मॅच फिनिशरची भूमिका पार पाडली. शिखर धवन ( ५२), लोकेश राहुल ( ३०) आणि विराट कोहली ( ४०) यांनीही दमदार खेळ केला. कोहलीनं अँड्य्रू टायच्या गोलंदाजीवर मारलेला स्कूप हा चर्चेचा विषय ठरला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा सहकारी एबीच्या स्टाईलची ती कॉपी होती.