भारतीय संघाला जग जिंकण्यासाठी आता फक्त 'या' संघाला नमवावं लागेल

72 वर्ष, 31 कसोटी मालिका, 29 कर्णधारांनंतर आशियाई संघाच्या कर्णधाराला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी नमवण्याचा पराक्रम करता आला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 08:54 AM2019-01-08T08:54:43+5:302019-01-08T08:55:57+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia : After historical won against Australia, South Africa remains the only box unticked for Indian Team | भारतीय संघाला जग जिंकण्यासाठी आता फक्त 'या' संघाला नमवावं लागेल

भारतीय संघाला जग जिंकण्यासाठी आता फक्त 'या' संघाला नमवावं लागेल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारताचा ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक कसोटी मालिका विजयविराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने रचला इतिहासपरदेशात भारताने मिळवले 14 कसोटी मालिका विजय

मुंबई : 72 वर्ष, 31 कसोटी मालिका, 29 कर्णधारांनंतर आशियाई संघाच्या कर्णधाराला ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरी नमवण्याचा पराक्रम करता आला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. सिडनी कसोटीचा खेळ पावसामुळे वाया गेला अन्यथा भारताने ही मालिका 3-1 अशी खिशात घातली असती. पण, 2-1 हा विजयही भारताला सुखावणारा आहे. भारतीय संघाने 2018ची सुरुवात दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ( 2-1) मालिकेत पराभवाने केली होती, परंतु 2019 मध्ये भारताने विजयाने प्रारंभ केला.



1947 साली भारतीय संघ प्रथमच ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला होता. तेव्हापासून 11 कसोटी मालिकेत भारताला विजय मिळवता आलेला नव्हता. मात्र, भारतीय संघाने 12 वी कसोटी मालिका जिंकली आणि इतिहास घडविला. या कामगिरीसह परदेशात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम कोहलीने करुन दाखवला आणि भारताच्या माजी कर्णधारांच्या पंगतीत त्याने स्थान पटकावले. पण, दक्षिण आफ्रिकेत भारताला अजूनही कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. भविष्यात आफ्रिकेत मालिका विजयाचा झेंडा फडकावल्यास भारतीय संघ जग जिंकल्याचा दावा करू शकतो.
भारताने कोणाच्या नेतृत्वाखाली जिंकल्या कसोटी मालिका... 
ऑस्ट्रेलिया ( 2-1) - 2018-19, विराट कोहली ( कर्णधार ) 
बांगलादेश ( 1-0) - 2000, सौरव गांगुली ( कर्णधार )
इंग्लंड ( 1-0) - 1971, अजित वाडेकर ( कर्णधार )
न्यूझीलंड ( 3-1) - 1968-69, मन्सूर अली खान पतौडी ( कर्णधार )
पाकिस्तान ( 2-1) - 2004, सौरव गांगुली ( कर्णधार )
श्रीलंका (1-0) - 1993, मोहम्मद अझरूद्दीन ( कर्णधार )
वेस्ट इंडिज ( 1-0) - 1971, अजित वाडेकर ( कर्णधार )
झिम्बाब्वे ( 2-0) - 2005, सौरव गांगुली ( कर्णधार )
भारतीय संघाने परदेशात एकूण 81 कसोटी मालिका खेळल्या आहेत आणि त्यापैकी 14 मालिका त्यांना जिंकता आल्या आहेत आणि 14 मालिका बरोबरीत सोडवल्या. बांगलादेशमध्ये भारताने सलग पाच कसोटी मालिका जिंकल्या आहेत.  

Web Title: India vs Australia : After historical won against Australia, South Africa remains the only box unticked for Indian Team

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.