Join us  

IND vs AUS : ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघात 'त्याची' वापसी, भारताला टेंशन

IND vs AUS: यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताला चार धावांनी पराभूत करताना दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 9:40 AM

Open in App
ठळक मुद्देपहिल्या दोन कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीरउस्मना ख्वाजाचे पुनरागमन, नवीन चेहऱ्यांना संधी 6 डिसेंबरपासून होणार कसोटी मालिकेला सुरुवात

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : यजमान ऑस्ट्रेलियाने पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात भारताला चार धावांनी पराभूत करताना दौऱ्याची दणक्यात सुरुवात केली. तीन सामन्यांच्या मालिकेत कांगारूंनी 1-0 अशी आघाडी घेतली आणि पुढील सामन्यांसाठी त्यांचे मनोबल उंचावले आहे. ट्वेंटी-20 मालिकेनंतर होणाऱ्या कसोटी मालिकेची तयारीही ऑस्ट्रेलियाच्या संघाने सुरू केली आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियाने संघ जाहीर केला आहे. स्टीव्हन स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांच्या परतीचे मार्ग बंद झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने आणखी एक प्रमुख अस्त्र समोर आणले आहे. त्यामुळे भारतीय संघाचे टेंशन वाढले आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी गुरुवारी ऑस्ट्रेलियाचा 14 सदस्यीय संघ जाहीर केला. या मालिकेतील पहिला सामना 6 डिसेंबरला अॅडलेड ओव्हल येथे होणार आहे. ऑस्ट्रेलियाने निवडलेल्या या संघात उस्मान ख्वाजाचे पुनरागमन झाले आहे. दुखापतीतून सावरलेला ख्वाजा भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो. त्याशिवाय संघ व्यवस्थापनाने मार्कस हॅरिसला पदार्पणाची संधी दिली आहे. पाकिस्तान दौऱ्यातील संघात समावेश नसलेला पीटर हँड्सकोम्बही पुनरागमन करणार आहे. 

व्हिक्टोरीया क्लबचे प्रतिनिधित्व करणाऱ्या हॅरिसने शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेत 250 धावांची नाबाद खेळी करून निडव समितिचे लक्ष वेधले. त्याने 87.40 च्या सरासरीने धावा कुटल्या आहेत. ''या संघात युवा फलंदाज व गोलंदाजांना संधी देण्यात आली आहे. त्यांनी शेफिल्ड शिल्डमध्ये चमकदार कामगिरी केलेली आहे. कसोटी सामन्यासाठी आम्ही अंतिम 12 जणांची निवड करणार आहोत. उर्वरित दोन खेळाडूंना शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत खेळण्याची परवानगी दिली जाईल,'' असे निवड समितीच्या ट्रॅव्हर होन्स यांनी सांगितले. 

पाकिस्तानविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत दुखापत झाल्यामुळे ख्वाजाची भारताविरुद्ध खेळण्याची शक्यता कमी होती, परंतु त्याने कमबॅक केले. त्याच्या समावेशामुळे ऑस्ट्रेलिया संघाला धीर मिळाला आहे.  

ऑस्ट्रेलियाचा संघ : अॅरोन फिंच, पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हीस हेड, उस्मान ख्वाजा, नॅथन लियॉन, मिचल मार्श, शॉन मार्श, टीम पेन, मिचेल स्टार्क, ख्रिस ट्रेमेन, पीटर सिडल.  

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाबीसीसीआय