Join us  

India vs Australia : ऑस्ट्रेलियाचा भारताला जोरदार धक्का; सलामीवीरांनीच काढली भारताच्या गोलंदाजीची हवा

पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच भारताच्य गोलंदाजांना धूळ चारत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 8:17 PM

Open in App

मुंबई, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताला पहिल्याच एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाने जोरदार धक्का दिला. वानखेडेवर झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच भारताच्य गोलंदाजांना धूळ चारत संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. भारताचे २५६ धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही फलंदाज न गमावता सहजपणे पूर्ण केले.

सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच यांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे नतमस्तक व्हायला भाग पाडले. या दोघांनी द्विशतकी भागीदारी रचत भारताच्या हातून सामना सहजपणे हिरावला. वॉर्नरने यावेळी चौकारासह आपले शतक पूर्ण केले. वॉर्नरचे हे एकदिवसीय कारकिर्दीतील १८वे शतक ठरले. 

कर्णधार फिंचनेही वॉर्नरला सुयोग्य साथ दिली आणि चौकारासह आपलेही शतक पूर्ण केले. फिंचनेही चौकारासह आपले अर्धशतक झळकावले.

ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनीच धू धू धुतले...भारताच्या गोलंदाजांना पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या सलामीवीरांनी धू धू धुतल्याचे पाहायला मिळाले. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या आजच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया सलामीवीरांनी भारताच्या गोलंदाजीची हवा काढून टाकल्याचे पाहायला मिळाले.

ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येचा चांगला पाया रचला होता. पण या दोघांनंतर एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांवर समाधान मानावे लागले.

भारताच्या २५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे डेव्हिड वॉर्नर आणि आरोन फिंच हे दोघे मैदानात उतरले. मैदानात उतरून या दोघांनी भारताच्या गोलंदाजांना आपल्यापुढे लोटांगण घालायला भाग पाडल्याचे पाहायला मिळाले. या दोघांनी दीडशतकी भागीदारी रचत ऑस्ट्रेलियाच्या विजयाचा भक्कम पाया रचला. 

 

 ऑस्ट्रेलियाच्या पहिल्याच एकदिवसीय सामन्यात भारताच्या फलंदाजांकडून हाराकिरी पाहायला मिळाली. सलामीवीर शिखर धवन आणि लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी रचत भारताच्या धावसंख्येचा चांगला पाया रचला होता. पण या दोघांनंतर एकाही फलंदाजाला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नाही आणि त्यामुळेच भारताला प्रथम फलंदाजी करताना २५५ धावांवर समाधान मानावे लागले.

 

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. सलामीवीर रोहित शर्माने दोन चौकार लगावत चांगली सुरुवात केली, पण त्याला फक्त १० धावांवर समाधान मानावे लागले. पण त्यानंतर धवन आणि राहुल यांनी भारताचा डाव सावरला. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १२१ धावांची भागीदारी रचली. धवनने यावेळी ९ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ७४ धावा केल्या. राहुलला यावेळी अर्धशतकासाठी तीन धावा कमी पडल्या.

राहुल आणि धवन दोन षटकांमध्ये बाद झाले आणि त्यानंतर भारताचा डाव चांगलाच गडगडला. कर्णधार विराट कोहली, मुंबईकर श्रेयस अय्यर, रिषभ पंत, रवींद्र जडेजा हे ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे हतबल झाल्याचे पाहायला मिळाले. अखेरच्या षटकांमध्ये मोहम्मद शमी आणि कुलदीप यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताला आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली.

टॅग्स :डेव्हिड वॉर्नरभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया