जस्टीन लँगरची माघार; भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया नव्या प्रशिक्षकासह येणार

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली तीन वन डे सामन्यांची मालिका 14 जानेवारीपासून सुरु होत आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2020 12:59 PM2020-01-07T12:59:06+5:302020-01-07T12:59:38+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia : Australia head coach Justin Langer to take break from India tour | जस्टीन लँगरची माघार; भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया नव्या प्रशिक्षकासह येणार

जस्टीन लँगरची माघार; भारत दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया नव्या प्रशिक्षकासह येणार

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ऑस्ट्रेलियानं नुकत्याच झालेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत 3-0 असे निर्भेळ यश मिळवले. तत्पूर्वी त्यांनी घरच्याच मैदानावर पाकिस्तानला 2-0 अशी धुळ चारली. घरच्या मैदानावर वर्चस्व गाजवल्यानंतर ऑसी संघ पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. टीम इंडियाला त्यांच्याच घरी आव्हान देण्याचा निर्धार ऑसी संघांनी बांधला आहे. पण, तत्पूर्वी त्यांच्या गोटात चिंता निर्माण करणारी बातमी धडकली आहे. भारत दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर हे विश्रांतीवर गेले आहेत. त्यामुळे ते संघासोबत भारत दौऱ्यावर येणार नाहीत.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली तीन वन डे सामन्यांची मालिका 14 जानेवारीपासून सुरु होत आहे. लँगर यांच्या अनुपस्थितीत संघाच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी आता वरिष्ठ साहाय्यक अँण्ड्य्रू मॅकडोनाल्ड यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली आहे. मॅकडोनाल्ड प्रथमच राष्ट्रीय संघाला मुख्य प्रशिक्षक म्हणून मार्गदर्शन करणार आहे.

भारत - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह

ऑस्ट्रेलिया - अ‍ॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अ‍ॅश्टन अ‍ॅगर, अ‍ॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लॅबुश्चॅग्ने, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अ‍ॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अ‍ॅडम झम्पा.

वेळापत्रक
14 जानेवारी - मुंबई
17 जानेवारी - राजकोट
19 जानेवारी - बंगळुरू 

Web Title: India vs Australia : Australia head coach Justin Langer to take break from India tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.