भारतानं 2020मधील पहिल्याच मालिकेत श्रीलंकेला नमवून नववर्षाची दणक्यात सुरुवात केली. आता टीम इंडियाला तगड्या ऑस्ट्रेलियाचा सामना करावा लागणार आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातली तीन वन डे सामन्यांची मालिका 14 जानेवारीपासून सुरू होणार आहे. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर पहिला सामना होणार आहे. टीम इंडियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर नमवणे सोपं नक्की नसेल आणि याची जाण कांगारुंना आहे. पण, तरीही तीन सामन्यांची ही मालिका ऑस्ट्रेलिया 2-1 अशा फरकानं जिंकेल, असा दावा ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज कर्णधारानं केला आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का, हिटमॅन रोहितला सराव करताना दुखापत
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने टीम इंडियाला घरच्या प्रेक्षकांसमोर हरवणं आव्हानात्मक असेल, परंतु अॅरोन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑसी संघ ते यशस्वीरित्या पार करेल, असा दावा केला आहे. तो म्हणाला,''वर्ल्ड कप स्पर्धेतील कामगिरीनंतर आणि घरच्या मैदानावरील कसोटी मालिकांच्या निकालानंतर ऑसी संघाचा आत्मविश्वास वाढलेला आहे. टीम इंडिया मागील वन डे मालिकेच्या पराभवाचा वचपा काढण्याचा प्रयत्न नक्की करेल, परंतु ही मालिका ऑसी 2-1 अशा फरकानं जिंकेल.''
India vs Australia : टीम इंडियाला नमवण्यासाठी कांगारूंचा मास्टर प्लान; उतरवणार हुकुमी एक्का
तो म्हणाला,''ऑस्ट्रेलियासाठी मधल्या फळीत तो सर्वोत्तम कामगिरी करेल. तो फिरकीचा उत्तमप्रकारे सामना करू शकतो, क्षेत्ररक्षातही चपळ आहे आणि फिरकी गोलंदाजीही करू शकतो. मार्नस हा परिपूर्ण पॅकेज आहे.'' मार्नसनं 2018मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. त्यानंततर त्यानं घरच्या मैदानावर 5 कसोटी सामन्यांत 896 धावा चोपल्या.
ऑस्ट्रेलिया - अॅरोन फिंच ( कर्णधार), डी'आर्सी शॉर्ट, अॅश्टन अॅगर, अॅलेक्स करी ( यष्टिरक्षक), पॅट कमिन्स, पीटर हँड्सकोम्ब, जोश हेझलवूड, मार्नस लाबुशेन, केन रिचर्डसन, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, अॅश्टन टर्नर, डेव्हीड वॉर्नर, अॅडम झम्पा.भारत - विराट कोहली, शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, रिषभ पंत. केदार जाधव, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, नवदीप सैनी, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह
वेळापत्रक14 जानेवारी - मुंबई17 जानेवारी - राजकोट19 जानेवारी - बंगळुरू