India vs Australia : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; आघाडीच्या शिलेदारांच्या अपयशानं टीम इंडियाची नाचक्की

India vs Australia :  अॅडम झम्पा आणि जोश हेझलवूडनं टीम इंडियाचं कंबरडं मोडलं. 

By स्वदेश घाणेकर | Published: November 27, 2020 05:41 PM2020-11-27T17:41:23+5:302020-11-27T17:43:59+5:30

whatsapp join usJoin us
India vs Australia: Australia won by 66 runs, take 1-0 lead in ODI series | India vs Australia : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; आघाडीच्या शिलेदारांच्या अपयशानं टीम इंडियाची नाचक्की

India vs Australia : ऑस्ट्रेलियाचा दणदणीत विजय; आघाडीच्या शिलेदारांच्या अपयशानं टीम इंडियाची नाचक्की

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देऑस्ट्रेलियाचा पहिल्या वन डे सामन्यात ६६ धावांनी विजयशिखर धवन, हार्दिक पांड्याची अर्धशतकी खेळी व्यर्थऑसी कर्णधार अॅरोन फिंच व स्टीव्ह स्मिथची शतकी खेळी

India Vs Australia : अॅरोन फिंच ( Aaron Finch), स्टीव्ह स्मिथ ( Steven Smith), डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि ग्लेन मॅक्सवेल ( Glenn Maxwell) यांनी टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या मर्यादा पहिल्या वन डे सामन्यात स्पष्ट केल्या. ऑस्ट्रेलियानं उभ्या केलेल्या तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाचे आघाचे चार शिलेदार झटपट माघारी परतले. शिखर धवन व हार्दिक पांड्या यांनी खिंड लढवली, परंतु त्यांना विजय मिळवून देता आला नाही. ऑस्ट्रेलियानं पहिला सामना जिंकून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

फिंचनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फिंचनं वॉर्नरसह पहिल्या विकेटसाठी १५६ धावांची भागीदारी केली.  वॉर्नर ७६ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ६९ धावा करून माघारी परतला. वॉर्नर माघारी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या धावगतीला चाप बसेल असे वाटले होते, पण स्मिथनं जोरदार फटकेबाजी केली. फिंचनं १२४ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारासह ११४ धावा केल्या. मॅक्सवेलनं १९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकारांसह ४५ धावा कुटल्या. स्मिथ ६६ चेंडूंत ११ चौकार व ४ षटकारांच्या मदतीनं १०५ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियानं ५० षटकांत ६ बाद ३७४ धावा केल्या.

प्रत्युत्तरात मैदानावर उतरलेल्या टीम इंडियाला मयांक अग्रवाल व धवन यांनी दमदार सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ५३ धावा जोडल्या. जोश हेझलवूडनं ही जोडी तोडताना मयांकला ( २२) माघारी पाठवलं. त्यानंतर झेलडवूडनंच १०व्या षटकात टीम इंडियाला दोन मोठे धक्के दिले. त्यानं कर्णधार विराट कोहली ( २१) आणि श्रेयस अय्यर (२) यांना बाद केले. आयपीएलमध्ये फॉर्मात दिसलेला लोकेश राहुल १२ धावांवर झम्पाच्या गोलंदाजीवर माघारी परतला. 


४ बाद १०१ धावा अशा अवस्थेत असलेल्या टीम इंडियासाठी हार्दिक धावून आला. त्यानं संयमी खेळी करणाऱ्या धवनला साजेशी साथ दिली. हार्दिकनं ३१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले. यासह त्यानं वन डे क्रिकेटमध्ये १००० धावांचा पल्लाही पार केला. धवनसह त्यानं पाचव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. हार्दिकनं भारताकडून वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद १००० धावांचा विक्रम नावावर केला. हार्दिकनं ८५७ चेंडूंत १००० धावा केल्या. यापूर्वी हा विक्रम केदार जाधवच्या ( ९३७ चेंडू) नावावर होता. झम्पानं ही जोडी तोडली. दोन वेळा जीवदान मिळालेला धवन ७४ धावांवर बाद झाला. हार्दिक- धवन यांनी पाचव्या विकेटसाठी १२८ धावा जोडल्या

हार्दिक आणि रवींद्र जडेजा ही जोडी भारताला विजय मिळवून देईल असे वाटत होते. पण, ऑसी गोलंदाजांनी टीम इंडियाच्या धावांचा वेग संथ केला होता. हार्दिक आज शतक पूर्ण करेल, असे वाटत असताना झम्पानं त्याला बाद केले. हार्दिक ७६ चेंडूंत ७ चौकार व ४ षटकार खेचून ९० धावांवर बाद झाला. वन डे क्रिकेटमधील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी ठरली. या विकेटनंतर टीम इंडिया दबावाखाली गेली आणि ऑसींनी त्यांना खिळवून ठेवताना तीन सामन्यांच्या मालिकेचा विजयानं प्रारंभ केला. अॅडम झम्पानं ५४ धावांत सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. हेझलवूडनं ५३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. भारताला ५० षटकांत ८ बाद ३०८ धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियानं हा सामना ६६ धावांनी जिंकला. 

Web Title: India vs Australia: Australia won by 66 runs, take 1-0 lead in ODI series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.